आरक्षण घेतल्याशिवाय एक इंच ही मागे हटणार नाही..! - मराठा योद्धा
मनोज जरांगे-पाटील
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा झाला या 75 वर्षांमध्ये सर्व पक्षासाठी मराठ्यांच्या पोरांनी अहोरात्र काम करून प्रत्येकाची मान उंचावली. म्हणूनच तुमची पोरं अमेरिकेपर्यंत पोचली तुम्हाला विमाने मिळाली तुमची राजकीय कारकीर्द मराठ्यांमुळे उजळून निघाली. अरे आता तरी मराठ्यांच्या वेदना जाणून घ्या आणि मराठ्यांना ताबडतोब आरक्षण द्या असे कळकळीचंआवाहन मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सोलापूर येथील हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये आयोजित केलेल्या एल्गार सभेमध्ये केलं आहे.
हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये मराठा समाजाला मार्गदर्शन करताना मराठा योद्धा म्हणून जरांगे पाटील पुढे म्हणाले की, " माझं शिक्षण कमी असून मला इंग्रजी येत नाही. मी पुस्तक वाचत नाही. परंतु माणूस वाचतो. त्यांच्या वेदना आणि माझ्या वेदना सारख्याच असल्यामुळे सर्व समाजाच्या वेदना ह्याच सरकारला सांगण्याचा माझा प्रयत्न असून संपूर्ण मंत्री मंडळ माझ्या जवळ ठाण मांडून बसलं तरी सुद्धा आणि विमानाने मुंबईकडे सहल म्हणालं तरीही न ढळता आरक्षणासाठी रात्रीचा दिवस करतोय. मराठा समाजाला मी माय बाप समजला असून या समाजासाठी या जातीसाठी जिवंत असेपर्यंत कधीच गद्दारी करणार नाही. कुठल्याही प्रकारच्या प्रलोभनाला बळी न पडता विमानात बसून पघळणारा नसून बैलगाडीत बसणारी माझी अवलाद आहे. असेही यावेळी त्यांनी सांगितलं.
आता सरकारकडे 5000 पुरावे सापडले आहेत. एक महिन्याचा वेळ दिला आहे दहा दिवस वाढवून दिले आहेत. त्यामुळे सरकारने अधिक ताणून न धरता मराठा समाजाला ताबडतोब आरक्षण द्यावे. कारण गेल्या 70 75 वर्षापासूनची आमची मागणी असून जर श्रीमंतांना आरक्षण मिळणार नसेल तर ओबीसी समाजाच्या नेत्यांकडे सुद्धा अनेक श्रीमंत नेते आहेत पेट्रोल पंप आहेत मग त्यांचंआरक्षण का दिलं. असा प्रश्न उपस्थित करून पाटलांनी सर्वांनाच आपल्या अभ्यासू भाषणाचे पुरावे प्रकर्षाने दिले. मी दिसायला जरी बँड बाजारातला खुळखुळा वाजवणारा दिसत असलो तरी मराठा समाजाच्या वेदना मी जवळून पाहिले आहेत आणि त्यामुळेच त्यांच्या पदरात हे शेवटचं आरक्षणाच दान पाडून घेण्यासाठी मी रात्रीचा दिवस आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असून गद्दारी आपल्या रक्तात नाही असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. मराठा आणि कुणबी असा वाद निर्माण न करता जसा कुणब्यांचा व्यवसाय शेती तसाच महाराष्ट्रातील तमाम मराठ्यांचा व्यवसाय सुद्धा शेतीच असून समुद्रात होडी करण्याचा व्यवसाय कोणाचाही नाही. त्यामुळे या सरकारने मंडल कमिशन आणि इंग्रजांचीच जनगणना वापरून 1990 मध्ये ओबीसीला 14 टक्के आरक्षण दिले. त्यानंतर 19 94 मध्ये त्यामध्ये वाढ झाली. त्यामुळे सर्व निकषावर मराठ्यांकडे उत्तर असल्यामुळे सरकारने मराठ्यांना आरक्षण देणे काळाची गरज आहे. त्यासाठी सर्व मराठा बांधवांनी आपली एकजूट कायम ठेवून कोणत्याही प्रकारच्या गटबाजीला थारा न देता एकसंघपणे राहावे. जाळपोळ न करता शांततेच्या मार्गाने आंदोलन करून आलेली संधी मराठा समाजातील बांधवांनी सोडू नये. शेवटी विजय तुमचा किंवा माझा होणार नसून तमा मराठ्यांचा विजय होणार असल्याने तिच्या 14 ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटी या ठिकाणी होणाऱ्या भव्य विराट सभेला शांततेच्या मार्गाने या .जनजागृती करा. आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला सोडणार नाही. एक इंच ही मागे हटणार नाही .यावेळी एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी सर्व आसमंत दणाणून सोडला. मराठा योद्धा म्हणून जरांगे पाटील यांचे विचार ऐकण्यासाठी मराठा समाजातील माता-भगिनी आणि बांधव हजारोच्या संख्येने हुतात्मा स्मृती मंदिर परिसरात उपस्थित होते.
.png)
0 Comments