पोलादपूरच्या पर्यवेक्षिका गीता निवृत्ती उतेकर यांना पुरस्कार प्रदान रायगड जिल्हा पोषण माह सांगता सोहळा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, October 9, 2023

पोलादपूरच्या पर्यवेक्षिका गीता निवृत्ती उतेकर यांना पुरस्कार प्रदान रायगड जिल्हा पोषण माह सांगता सोहळा

 पोलादपूरच्या पर्यवेक्षिका गीता निवृत्ती उतेकर यांना पुरस्कार प्रदान

रायगड जिल्हा पोषण माह सांगता सोहळा

 

मुंबई (कटूसत्य वृत्त):- महिला व बाल विकास विभागांतर्गत पोषण माह चा सांगता समारंभ तसेच अंगणवाडी सेविकामदतनीस व पर्यवेक्षिका पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन नुकतेच अलिबाग येथील होरायझन हॉल येथे आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात बिट स्तरावर १०० टक्के मोबाईल  व्हेरिफिकेशन पर्यवेक्षिका पुरस्कार -  पोलादपूर तालुक्यातील गीता निवृत्ती उतेकर (पोलादपूर)सुविधा संतोष मिरगळ (पोलादपूर) यापूर्वीही ९ सप्टेंबर २०१९ रोजी  रायगड जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने महाड तालुक्यातील नागाव बिटमधील प्राविण्य मिळविल्याबद्दल  गीता निवृत्ती उतेकर यांना आदर्श पर्यवेक्षिका पुरस्काराने यांना राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे पोषण अभियानात उत्कृष्ट कामगिरी केलेला प्रकल्प - बाल विकास प्रकल्प अधिकारी माधुरी फड पोलादपूरआदर्श अंगणवाडी सेविका - विमल जगदाळे (कापडे बुद्रुक)आदर्श अंगणवाडी मदतनीस सेविका - शुभांगी कासार (चरई) यांनाही पुरस्काराने गौरविण्यात आले. गेल्या चार वर्षापासून राबविण्यात येणाऱ्या पोषण माह अभियानात रायगड जिल्ह्याने नेहमीच उल्लेखनीय कामगिरी बजावली असूनजिल्हा नेहमीच राज्यात पहिल्या तीन क्रमांकांमध्ये राहिला आहेअसे गौरवोद्गार राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी अलिबागमध्ये आयोजित कार्यक्रमात काढले. रायगड जिल्ह्यात पोषण माह अभियानात राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. याचे श्रेय प्रशासनासोबत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे आहे. यापुढील कालावधीत जिल्हा प्रथम क्रमांकावर राहीलअसे काम करू असा विश्वास व्यक्त केला. तसेच आदिती तटकरे यांनी महिला व बालविकास विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या डॉ. आनंदीबाई जोशी आरोग्य शिबीरनवरात्रीनिमित्त नऊरंग पोषणाचे या उपक्रमांची माहिती देतअंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सरकारकडून दिवाळीत देण्यात येणारी भाऊबीज भेट दिवाळीपूर्वी देण्याची घोषणा केली. तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड आपल्या भाषणात  म्हणाले कीराज्याच्या विकासात महिला व बालकांचा मोठा वाटा आहे. सरकारच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण व पोषण करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. सुदृढ बालके जन्माला येण्यासाठी गरोदर महिलांना पोषण आहार पुरविण्यात येत आहे. तसेच बालकांच्या जन्मानंतर स्तनदा मातांना आहार देण्यात येतो. जिल्ह्यात 3 वर्षांपर्यंतच्या सुमारे ४२  हजार बालकांच्या पोषण आहाराकडे लक्ष देण्यात येत आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस पोषण आहार पुरविण्याकडे लक्ष देत आहेत. तसेच शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवित आहेत. महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनातसेच उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पोषणविषयक विविध पदार्थपालेभाज्यांच्या स्टॉलचे प्रदर्शन व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अंगणवाडी उपायुक्त विजय क्षीरसागरपोषण माह उपायुक्त आनंद खंडागळे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाडअतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडेजिल्हा परिषद मुख्य वित्त लेखा अधिकारी राहुल कदममहिला व बालविकास उपमुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचिक यांच्यासह जिल्हा परिषद विविध विभागांचे अधिकारीकर्मचारीअंगणवाडी सेविकामदतनीस उपस्थित होते.



No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages