Hot Posts

6/recent/ticker-posts

सांस्कृतिक क्षेत्रात महामुनी यांनी महाराष्ट्रभर वेगळी ओळख निर्माण केली - अँड विनोद कांबळे

 सांस्कृतिक क्षेत्रात महामुनी यांनी महाराष्ट्रभर वेगळी ओळख निर्माण केली -  अँड विनोद कांबळे


 मोहोळ (कटूसत्य वृत्त):- प्रतिकूल परिस्थिती असतानाही सांस्कृतिक क्षेत्रात मोहोळ गावाचे नाव संबंध महाराष्ट्रभर उंचावले व या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण केली व अडगळीत राहिलेल्या कलाकारांनां सातत्याने निर्माण होणाऱ्या समस्यांचे निराकरण करीत विचारपीठ तयार करण्याचे काम सिनेअभिनेते अमोल महामुनी यांनी केलेचे प्रतिपादन विनोद कांबळे यांनी यावेळी व्यक्त केले.  सामाजिक क्षेत्रापासून ते सांस्कृतिक कार्यात ठसा उमटविलेलं अष्टपैलू व्यक्तीमत्व अमोल महामुनी यांचा वाढदिवस शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने करण्यात आला होता याप्रसंगी ते बोलत होते.
     याप्रसंगी राजकारण विरहित शासकीय समितीवर कार्यरत असणारे राजन घाडगे, भीम युवा प्रतिष्ठानचे विनोद कांबळे, ह.ब.प. शरद शिंगाडे, रंगभूमी प्रतिष्ठानचे हणमंत काळे, दिनेश नरळे, अनुरथ शिंगाडे, शिव सेनेचे प्रवक्ते बाळासाहेब वाघमोडे, पत्रकार संघटनेचे माजी अध्यक्ष भारत नाईक, उद्योजक अविनाश वाघमोडे, अक्षय पोतदार, गणेश व्यवहारे, मोहसीन शेख, संस्कार महामुनी, फोटो ग्राफर असोसिएशन अध्यक्ष हरिभाऊ नगरे, समाज सेवक राहुल तावसकर, गोरख सरवदे, देविदास चेंडगे, अनगर गावाचे सूरछाया फिल्मचे विनोद बोडके, ग्राहक समितीच्या तालुका अध्यक्ष लता पाटील, शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्ष यशोदा कांबळे, विधी स्वसेवक महेश शिंदे ,अमोल काळे ,राकेश डोंगरे, समाधान  डोंगरे, सागर खुले, जेष्ठ मार्गदर्शक गुलाबराव देशमुख, जयराम टेकाळे, रोहित काळे, किरण शिंगाडे, बापू राऊत, सोहेल शेख, सागर काळे, प्रमोद सावंत, विक्रांत बाबर, असलम मुलाणी, अण्णा शिंदे, समाधान क्षीरसागर, सचिन सरवदे, सचिन चव्हाण आदींनी पुष्पहार देऊन दीर्घायुष्य लाभण्याच्या शुभेच्छा दिल्या.

     पुढे बोलताना कांबळे म्हणाले कि मोहोळ शहरात कलाकारांना कला सादर करण्यासाठी स्वतंत्र सांस्कृतिक सभागृह व नाट्यग्रहची उभारणी व्हावी याकरीता सातत्याने प्रत्नशील असलेचे सांगितले. तसेच रंगभूमीच्या प्रतिष्ठानचे हणमंत काळे यांनी कलाकारांच्या अद्यावत नोंदी शाषम स्तरावर होण्यासाठी प्रत्नशील राहून कलाकारांच्या न्याय हक्कासाठी झगडणारे नेतृत्व महामुनी यांच्या माध्यमातून पाहावयास मिळत आहे कलाकारांनी शासकीय योजनेचा लाभासाठी अमोल महामुनी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन केले.

     कलाकारांच्या हक्कासाठी सदैव तत्पर असुन यापुढेही कलाकारांचा पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे आणि सर्व स्तरातील मान्यवरांनी  वाढदिवस साजरा केल्याबद्दल अमोल महामुनी यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

Reactions

Post a Comment

0 Comments