कंदर ग्रामस्थांच्या वतीने विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार संपन्न
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- कंदर व परिसरातील बिटरगाव ,केम येथून विविध क्षेत्रात अधिकारी व पदाधिकारी नूतन पदावर नियुक्ती झालेल्या मान्यवरांचा सत्कार कंदर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. यावेळी नुतन रयत क्रांती पक्षाचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख, राजकुमार सरडे नूतन करमाळा बाजार समितीचे सदस्य आण्णासाहेब पवार नूतन करमाळा बाजार समितीचे सदस्य शिवाजी राखुंडे, नूतन करमाळा बाजार समिती सदस्य सागर दौंड, जिल्हा कुस्तीगीर सदस्य उमेश काका इंगळे युवा शेतकरी पुरस्कार अभिजीत भांगे, आदर्श शिक्षक पुरस्कार अतुल लोंढे , नूतन पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र माने, पोलीस सुरज माने, करमाळा बाजार समितीचे नूतन सदस्य कुलदीप पाटील, रयत क्रांती पक्षाचे करमाळा तालुका कोषाध्यक्ष संतोष निंबाळकर यांचा कंदर मध्ये सत्कार संपन्न झाला. यावेळी रंगनाथ शिंदे, अण्णासाहेब कदम ,संभाजी लोंढे , सुभाष पवार, उपसरपंच मौलासाहेब मुलाणी, विठ्ठल तात्या काळे, औदुंबर लोकरे, अरुण आबा सरडे ,त्रिंबक माने, शिवशंकर माने , कंदर विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य सागर शिंदे, आबा सुरवसे, दाऊत मुलाणी, पिंटू भगत, संतोष माने, दीपक खोचरे ,विठ्ठल नवले राजकुमार माने, भागवत दादा पाटील ,अजित वगरे, उमेश गाडे, नवनाथ काळे, दादा ननवरे, आदी सर्व मान्यवर उपस्थित होते. पुरस्कारर्थी व पदाधिकाऱ्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी सूत्रसंचालन विठ्ठल तात्या काळेयांनी केले. आभार शिवशंकर माने यांनी मानले.
0 Comments