पृथ्वीराज घाडगे शालेय राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत प्रथम:बबनरावजी शिंदे विद्यालय अकोलेचा खेळाडू - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 27, 2023

पृथ्वीराज घाडगे शालेय राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत प्रथम:बबनरावजी शिंदे विद्यालय अकोलेचा खेळाडू

 पृथ्वीराज घाडगे शालेय राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत

प्रथम:बबनरावजी शिंदे विद्यालय अकोलेचा खेळाडू 



टेंभुर्णी  (कटूसत्य वृत्त):-बबनरावजी शिंदे माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय अकोले (खुर्द )चा विद्यार्थी पृथ्वीराज सावता घाडगे शालेय राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत 17 वर्षाखालील गटात रिकर्व्ह व प्रकारात प्रथम क्रमांक संपादन केला. गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. दिनांक 21 आणि 22 रोजी विभागीय क्रीडा संकुल अमरावती येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत पृथ्वीराज ने  ओव्हर ऑल 1344 गुण घेऊन प्रथम क्रमांक संपादन केला. 30 व 50 मिटर अंतरावर सुवर्णपदके, सांघिक सुवर्णपदक, ओव्हर ऑल सुवर्णपदक,70 मीटर अंतरावर एक रजत व 60 मीटर अंतरावर कास्य पदकासह.व 30 मीटर अंतरावरून 355 रेकॉर्ड ब्रेक स्कोर करून  प्रथम क्रमांक संपादन केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.प्रशालेचे क्रीडाशिक्षक विजय माने,सावता घाडगे.जोतिराम श्रीराम,बिराजदार सर, रोहित चव्हाण सर,समाधान मिस्किन सर यांचे मार्गदर्शन लाभले .

यशस्वी खेळाडू व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे अभिनंदन करमाळा तालुक्याचे आमदार तथा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा . संजयमामा शिंदे , संस्थेचे सचिव तथा प्रशालेचे प्राचार्य मा . राजेंद्र  ठोंबरे सर, प्रशालेतील जेष्ठ शिक्षक श्री संभाजी अनपट सर  , स . रा . मोरे प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका मा . सौ . मधुरा सुरवसे मॅडम ,  तसेच प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिकचे सर्व शिक्षक - शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन करून पुढील राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages