वीरशैव व्हिजन व सोलापूर हेल्पलाइन तर्फे 11 हजार पाणी बाटल्यांचे वाटप
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- वीरशैव व्हिजन व सोलापूर हेल्पलाइन तर्फे श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी पायी चालत जाणाऱ्या भाविकांसाठी जुना तुळजापूर नाका येथील मड्डी वस्ती येथे 11 हजार पाणी बाटल्यांचे वाटप करण्यात आले.
पाणी बाटली वाटपाचा शुभारंभ जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक संजीवनी व्हट्टे यांच्या हस्ते उद्योजक भीमाशंकर करजगीकर, अडत व्यापारी मारुती बिराजदार, सोलापूर हेल्पलाइनचे संचालक राहुल शेटे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी तिरुपती इंटरप्राईजचे महेश शिंदे, वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, उत्सव समिती अध्यक्ष चिदानंद मुस्तारे सचिव नागेश बडदाळ, सहकोषाध्यक्ष विजयकुमार बिराजदार, युवक आघाडीचे उपाध्यक्ष सोमनाथ चौधरी उपस्थित होते.
पाणी बाटली वाटपाच्या यशस्वीतेसाठी गणेश कदारे, श्रीकांत लोणी, मन्मथ कपाळे, गणेश सूर्यवंशी, रवी मुंडासे, मनोज चौधरी, महेश घुले यांनी परिश्रम घेतले.

0 Comments