"आयटीआय डिसेंबर 2023 पुरवणी परीक्षा फॉर्म 18 ऑक्टोबर पर्यंत भरणे बाबत आवाहन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, October 7, 2023

"आयटीआय डिसेंबर 2023 पुरवणी परीक्षा फॉर्म 18 ऑक्टोबर पर्यंत भरणे बाबत आवाहन


"आयटीआय डिसेंबर 2023 पुरवणी परीक्षा फॉर्म 18 ऑक्टोबर पर्यंत भरणे


 बाबत आवाहन



सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  आयटीआय अनुत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांची सीबीटी इंजिनिअरिंग ड्रॉईंग व प्रात्यक्षिक या विषयांची अन्युअल पॅटर्न पुरवणी परीक्षा डिसेंबर 2023 मध्ये होणार आहे. त्यानुसार सन 2018 प्रवेशित दोन वर्षे कालावधीच्या व्यवसाय अभ्यासक्रमाचे प्रशिक्षणार्थी व 2019 प्रवेशित एक वर्ष कालावधीच्या व्यवसाय अभ्यासक्रमाचे प्रशिक्षणार्थी आणि जुलै /ऑगस्ट 2023 च्या अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेपासून वंचित व अनुत्तीर्ण राहिलेले प्रशिक्षणार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा डिसेंबर 2023 ची प्रात्यक्षिक विषयांची परीक्षा दि.01 डिसेंबर 2023 ते 06 डिसेंबर 2023 या कालावधीत तसेच सीबीटी परीक्षा 10 डिसेंबर 2023 पासून ऑनलाईन पद्धतीने घेण्यात  येणार असल्याचे कळविले आहे.  तरी प्रवेशित ॲन्युअल  पॅटर्न माजी प्रशिक्षणार्थ्यांनी व इच्छुक रिपीटर प्रशिक्षणार्थ्यांनी दि. 18 ऑक्टोबर 2023 पूर्वी परीक्षा फॉर्म भरावेत. अधिक माहितीसाठी संस्थेमध्ये समक्ष भेटावे, असे आवाहन विजापूर रोड आयटीआय येथील प्राचार्य ए. डी. जाधवर यांनी केलेआहे.        

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages