Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रहार दिव्यांग संघटनेचे विविध मागण्यांसंदर्भात निवेदन

 प्रहार दिव्यांग संघटनेचे विविध मागण्यांसंदर्भात निवेदन 


|माढा (कटूसत्य वृत्त):-  जुलै ते सप्टेंबर असे ३ महिने उलटून गेले तरीही संजय गांधी योजनेतंर्गत दिव्यांग,विधवा,श्रावणबाळ आदी योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यावर अद्याप अनुदानरूपी पेन्शन जमा झाली करावी या सह अन्य मागण्याचे निवेदन प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने तहसीलदार विनोद रणवरे यांना देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,माढा तालुक्यातील दिव्यांगांना अंत्योदय योजनेत सरसकट समाविष्ट करण्यात यावा.माढा तालुक्यात संगांयो अंतर्गत बोगस लाभार्थ्यांची संख्या जास्त प्रमाणात असून, प्रशासनाकडून लाभार्थी यांची पडताळणी करून  दोषींवर कारवाई करावी.रेशन दुकानदार यांच्याकडून, दिव्यांगांना कमी प्रमाणात माल वाटप करून अन्याय होत आहे.त्या दुकानदारांवर योग्य ती कारवाई करावी. तसेच महाराष्ट्र शासन कर्मचाऱ्यांना १ तारखेला पगार दिला जातो. पेंशन दरमहा किमान ५ तारखेला खात्यावर जमा करावी.अश्या मागण्या  निवेदनात नमुद कण्यात आल्या आहेत.यावेळी प्रहार दिव्यांग संघटनेचे माढा तालुकाध्यक्ष विजय चव्हाण,उपाध्यक्ष गोरख देवकर,कुर्डूवाडी शहराध्यक्ष संतोष कांबळे,टेंभूर्णी शहराध्यक्षा अंजुषा देशपांडे,प्रहार सेवक राजाभाऊ शिंदे,वाकाव शाखाप्रमुख नामदेव सावंत,गिता लादे यांचेसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments