Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर ते शिंगणापूर महामार्गाच्या मंजूरी साठी १५ ऑक्टोबरपासून पायी चालत निघणार कावडयात्रा...माढा तालुक्यातील सर्वपक्षीय नेतेमंडळी व ग्रामस्थांचा

 तुळजापूर ते शिंगणापूर महामार्गाच्या मंजूरी साठी  १५  ऑक्टोबरपासून

 पायी चालत निघणार कावडयात्रा...माढा तालुक्यातील सर्वपक्षीय नेतेमंडळी

 व ग्रामस्थांचा  संत कुर्मदास कारखान्यावरील बैठकीत निर्धार

 


माढा (कटूसत्य वृत्त):- तुळजापूर ते शिखर शिंगणापूर महामार्गाच्या मागणीसाठी माढा तालुक्यातील सर्वपक्षीय नागरिकांची तुळजापूर ते शिखर शिंगणापूर कावड यात्रा दिनाक १५ ऑक्टोबर पासून काढली जाणार असून  याच्या चर्चेसाठी आणि नियोजनासाठी पडसाळी ता.माढा येथे  सर्वपक्षीय  नेते व कार्यकर्त्याची बैठक संपन्न झाली.

 कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि छत्रपती शिवाजी महाराजाचे आराध्य दैवत शंभू महादेव यांना जोडणारा हा महामार्ग होणे अत्यावश्यक आहे.हा महामार्ग झाला तर दुर्लक्षित असणाऱ्या अनेक गावांचा विकास होऊ शकतो. यासाठी शासनदरबारी रेटा लावणे गरजेचे आहे.म्हणून जात धर्म पंत आणि पक्ष सोडून सर्वानी यासाठी एकत्र येण्याचे आवाहन यावेळी सर्वपक्षीय नेते मंडळीनी केले.कावड यात्रेच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीस शिवसेनेचे  संपर्कप्रमुख   संजय कोकाटे,श्री संत कुर्मदास कारखान्याचे संचालक दादासाहेब साठे,राष्ट्रवादी काँग्रेसचे अॅड.बाळासाहेब पाटील, रयत क्रांती संघटनेचे सुहास पाटील,जलतज्ञ अनिल पाटील, ज्ञानेश्वर माऊली सलगर,शिवसेनेचे नेते विनोद पाटील,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष औदुंबर महाडीक,पंचायत समिती सदस्य डॅा.प्रदीप पाटील,पडसाळीचे सरपंच योगेश पाटील,व्हा चेअरमन सुधीर पाटील,राजाभाऊ चवरे,राहुल पाटील,नगरसेवक नितीन साठे,अजिनाथ माळी,बेंबळेचे सरपंच विजय पवार,परितेचे सरपंच हनुमंत भोसले,चिंचोलीचे सरपंच संतोष लोंढे,भुताष्टेचे सरपंच सुरेश यादव,भेंडचे सरपंच संतोष दळवी,जाधववाडीचे सरपंच राहुल जाधव,तंटामुक्तीचे अध्यक्ष महेश पाटील,दीपक खोचरे आदी सह ग्रामस्थ  उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments