जिल्हा उद्योग केंद्राच्या परिसरात ' मधुबन ' या ब्रँड ने मध विक्री सुरू
*सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी मधुबन ब्रँड चा नैसर्गिक मध खरेदी
करण्याचे आवाहन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मध संचालनालय महाबळेश्वर येथे मध उत्पादन प्रक्रिया केंद्र असुन येथील महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे मध “मधुबन" या ब्रँन्ड नावाने विक्री करण्यात येत आहे. या मधाचे विक्री केंद्र सोलापूर येथे जिल्हा उद्योग केंद्र यांचे परिसरात दिनांक 4 ऑक्टोबर 2023 रोजी पासुन महात्मा गांधी जयंती निमीत्त सुरू करण्यात आले आहे. ह्या विक्री केंद्रा मध्ये नॅचरल मध व सेंद्रीय मध असे दोन प्रकारचे मध सद्या विक्री करीता उपलब्ध आहेत. तरी सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी मध खरेदी करण्याचे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी सोलापूर यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे मध संचालनालय महाबळेश्वर येथे जिल्हा अंतर्गत शेतकरी, प्रगतशिल मधपाळ (केंद्र चालक) यांना मधमाशा पालन प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षण घेवुन मधमाशा पालन उद्योग सुरु केलेल्या लाभार्थी कडुन हमी भावाने मध खरेदी केला जातो. तसेच महाबळेश्वर येथे सेंद्रीय मध उत्पादन करण्यात येते.
मधाचे उपयोग-
आयुर्वेदीक औषधे मधाबरोबर घेतल्याने औषधाची परिणामकारकता वाढते. भाजलेल्या व अन्य जखमा भरुन येण्यासाठी अँटिबायोटीक/अँटिसेप्टिक. खोकला, कफ, दमा या विकारांवर. यकृताच्या, पोटाच्या आजारावर मध सेवनाने फायदा होतो. लहान मुलांना व वृध्दंना ताबडतोब हुशारी वाढवण्यासाठी. थकवा दूर करण्यासाठी, जलद कार्यशक्ती वाढवण्यासाठी. आयुर्मान वृध्दीसाठी, शरीराची झीज भरून काढण्यासाठी. वजन कमी करण्यासाठी. डोळयांच्या विविध विकारांवर अंजन म्हणुन. विविध कायाकल्पात फेशियलकरीता, सौंदर्यप्रसाधनात. हृदयाच्या स्नायुंना ताकद मिळते. आम्लपित्त कमी करण्यासाठी. हाडांच्या बळकटीसाठी. व्रण भरुन काढण्यासाठी. 10 ग्रॅम मधापासुन सुमारे 30 ते 35 कि. कॅलरीज मिळतात. केसांच्या सौंदर्यासाठी व वृध्दीसाठी. विधि व धार्मिक कार्यात
तरी ज्यांना मध घ्यावयाचा आहे. त्यांनी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, व्दारा जिल्हा उद्योग केंद्र, किनारा हॉटेल समोर, होटगी रोड, सोलापूर येथे संपर्क साधवा. तसेच नैसर्गिक पद्धतीने तयार झालेला मध खरेदी करण्याचे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी सोलापूर यांनी केले आहे.
0 Comments