Hot Posts

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 व 13 तसेच कृष्णा खोरे अंतर्गत जमिनी गेलेल्या खातेदारांनी नुकसान भरपाई मागणी प्रस्ताव सादर करावेत

 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 व 13 तसेच कृष्णा खोरे अंतर्गत

जमिनी गेलेल्या खातेदारांनी नुकसान भरपाई मागणी प्रस्ताव सादर


 करावेत




 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्र. 13 सोलापूर विजापूर बाहयवळण / चार पदरी रस्ता हा उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्यातीतून गेलेला आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र.9 (नवीन क्र.65) हा माढामोहोळउत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर या तालुक्यामधून  गेला आहे.

      राष्ट्रीय महामार्ग क्र. 13 सोलापूर विजापूर बाहयवळण व चारपदरी रस्त्यासाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील  कवठे डोणगांव ,नंदूर ,बसवेश्वनगर समशापूर हिरज ,बेलाटी व दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे  टाकळी नांदणी बसवनगर मंद्रुप ,वडकबाळ हत्तूर असे एकूण 13 गावचे काही बाधित खातेदारांनी अद्याप नुकसान भरपाई मागणी प्रस्ताव सादर केलेले नाहीत.

       राष्ट्रीय महामार्ग क्र. 09 (नवीन क्र.65) पुणे- सोलापूर महामार्गासाठी माढा तालुक्यातील  वेणेगांव वरवडे अरण चव्हाणवाडी टेंभूर्णी रांझणी मोडनिंब तसेच मोहोळ तालुक्यातील  शेटफळ मोहोळ सावळेश्वर ,चिंचोळी यावली चिखली व उत्तर सोलापूर तालुक्यातीलल  बाळे केगांव सोलापूर असे एकूण 16 गावांमधील काही बाधित खातेदारांनी अद्याप नुकसान भरपाई मागणी प्रस्ताव सादर केलेले नाहीत.

     तरी वर नमूद गावचे बाधित खातेदारांना यापूर्वीच उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र. 11 कृष्णा खोरे सोलापूर या कार्यालयाडून राष्ट्रीय महामार्ग अधिनियम, 1956 (1956 चा 48) आणि 1997 चे सुधारणा कायदा कलम 3G (1) (2) आणि 3H (2) (3) आणि 3E (1) (2) नोटीशीन्वये वारंवार सर्व बाधित खातेदारांना सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन नुकसान

भरपाई मिळणेकामी मागणी प्रस्ताव सादर करणेबाबत यापूर्वी कळवून सुध्दा अद्याप काही बाधित खातेदारांनी नुकसान भरपाई मिळणेकामी मागणी प्रस्ताव सादर केलेले नाहीत.

     तरी वर नमूद महामार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनीची नुकसान भरपाईची रक्कम घेऊन जाणेकामी सर्व वृत्तपत्रांमध्ये प्रसिध्दी देण्यात यावी.

सदरची मोबदल्याची नुकसान भरपाईची रक्कम घेऊन न गेल्यास राष्ट्रीय महामार्ग अधिनियम 1956 मधील तरतुदीनुसार तुम्हांस देय असलेली नुकसान भरपाईची रक्कम जिल्हा न्यायालयात जमा करणेत येईल याची कृपया नोंद घ्यावीअसे उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक 11 तथा सक्षम प्राधिकारी अभिजीत पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकांना वेळ कळविले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments