*राजराजेश्वरी प्रशालेचा राष्ट्रीय इन्सपायर विज्ञान प्रदर्शनासाठी निवड* - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, October 7, 2023

*राजराजेश्वरी प्रशालेचा राष्ट्रीय इन्सपायर विज्ञान प्रदर्शनासाठी निवड*

 *राजराजेश्वरी प्रशालेचा राष्ट्रीय इन्सपायर विज्ञान प्रदर्शनासाठी निवड* 


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- विनायक नगर येथील राजराजेश्वरी माध्यमिक प्रशालेतील रितू अण्णा कलबुर्गी या विद्यार्थीनीची राष्ट्रीय इन्सपायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.सोलापूरसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
       इंदिरा गांधी स्टेडियम,दिल्ली येथे दि.९ ते ११ ऑक्टोबर रोजी दहावे राष्ट्रीय इन्सपायर अवार्ड योजनेतंर्गत राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशालेतील रितू कलबुर्गी या विद्यार्थीनीने शैवाल क्लिनिंग मशीन हे विज्ञान  उपकरण राष्ट्रीय स्पर्धेसाठी मांडणार आहे. महाराष्ट्रातून २८ तर  देशभरातून ६०० विद्यार्थी सहभागी होत आहे. केंद्र सरकारकडून हे उपकरण साहित्य बनविण्यासाठी पंधरा हजार मिळाले असून सोलापूर-दिल्ली-सोलापूर प्रवास खर्च तसेच जेवण व राहण्याची सोय सरकारमार्फत करण्यात आले आहे.आज उपकरण साहित्य घेऊन कलबुर्गी व विज्ञान शिक्षक शितल पाटील दिल्लीला रवाना झाले. शैवाल क्लिनिंग मशीन हे उपकरण कमी खर्चिक व वेळ वाचविण्यासाठी तयार करण्यात आली आहे. पावसाळ्यात ओलसर जागी भींतीवर अथवा फरशीवर शैवाल निर्मिती होते ती काढण्यासाठी उपयोग होतो. मशीनच्या साह्याने औषध फवारणी केल्यामुळे कायमचा शैवाल निघून जाण्यास मदत होते. फरशीवरील शेवाळ देखील दूर करण्यास मदत होते. कोणत्याही प्रकारचा स्पर्श न करता सोप्या पद्धतीने काढू शकतो.कमी पाण्यात व कमी वेळेत हे स्वच्छ करता येते. 
  प्रशालेचे विज्ञान शिक्षक शितल पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार, प्रशालेचे मुख्याध्यापक विश्वनाथ तंबाके, मुख्याध्यापक रविशंकर कुंभार, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे, संस्थेचे सर्व प्राध्यापक, शिक्षक ,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वृंदानी अभिनंदन करुन शुभेच्छा दिले.

 *विज्ञान शिक्षकाची आवड* 
 विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनात विज्ञानाविषयी आवड व जिज्ञासू वृत्ती निर्णय होण्यासाठी गेल्या चौदा वर्षांपासून विज्ञान प्रदर्शनासाठी वस्तू तयार करीत आहे.एक वेळा राष्ट्रीय स्तरावर,चार वेळा राज्य स्तरावर आठ वेळा जिल्हा स्तरावर विज्ञान प्रदर्शनासाठी तयार केलेली विज्ञान साहित्य , वस्तू, उपकरणांची निवड झाल्याचे विज्ञान शिक्षक शितल पाटील सांगितले.विज्ञान विषयाची आवड असल्याने मी स्वतः शालेय जीवनापासून विज्ञान प्रदर्शनासाठी जात असल्याचे ते बोलले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages