Hot Posts

6/recent/ticker-posts

महात्मा फुले विद्यालय टेंभुर्णी येथे चित्रकला परीक्षा केंद्राचे उद्घाटन संपन्न.....

 महात्मा फुले विद्यालय टेंभुर्णी येथे चित्रकला परीक्षा केंद्राचे उद्घाटन संपन्न.....   



टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-  टेंभुर्णी येथील महात्मा फुले विद्यालयात चालू वर्षीपासून एलिमेंटरी व इंटरमीजिएट ग्रेड या चित्रकला परीक्षेचे केंद्र नव्याने मंजूर झालेले आहे. कला संचालनालय , महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडून परीक्षा केंद्राला मंजुरी मिळालेली आहे. आज त्याचे उद्घाटन चित्रकलेचे सेवानिवृत्त कलाशिक्षक आर्टमास्टर आदरणीय श्री कुंडलीक माळी सर यांच्या हस्ते झाले. परीक्षा केंद्रामध्ये एलिमेंटरी चित्रकला परीक्षेसाठी 202 विद्यार्थी व इंटरमीजिएट ग्रेड चित्रकला परीक्षेसाठी 64 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. यावेळी सर्व उपस्थित परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सुरुवातीला श्री नारायण भानवसे यांनी प्रास्ताविक करून, प्रमुख पाहुणे आदरणीय श्री कुंडलिक माळी सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री नारायण भानवसे सर, विद्यालयाचे मुख्याध्यापक व केंद्रसंचालक श्री विजय यादव सर उपस्थित होते. श्री माऊली पवार सर आणि विद्यालयातील कलाशिक्षक श्री संतोष माळी सर व श्रीमती रेश्मा मोरे मॅडम यांनी परिश्रम घेतले. यावेळी नागनाथ सुक्रे सर , शुभम हवलदार सर , सचिन खडके सर, सोहम व्यवहारे सर, रमेश नाळे सर, गिरीश देशपांडे सर, मच्छिन्द्र भुसारे सर, सचिन जाधव सर, शिवकन्या कानडे मॅडम, प्रियंका हावळे मॅडम,प्राजक्ता नागटिळक मॅडम, अश्विनी कांबळे मॅडम, वदंना क्षीरसागर मॅडम, सायली गिरमे मॅडम, अंकिता बोराटे मॅडम, सुजित साळुंखे, अनिल राऊत,आदी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments