Hot Posts

6/recent/ticker-posts

घामाचा पैसा लुटणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी संघर्ष हाच पर्याय आहे. -राजू शेट्टी यांचे प्रतिपादन

 घामाचा पैसा लुटणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी संघर्ष हाच पर्याय आहे.

-राजू शेट्टी यांचे प्रतिपादन



टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- सर्व जिल्ह्यात दर चांगला मिळतो.मात्र या सोलापूर जिल्ह्यातच काय अडचण आहे.?या ठिकाणी रिकव्हरी चोरली जाते असेच म्हणावे लागेल.परिस्थितीने करपलेल्या व शेतात राबणाऱ्यांची लूट नामवंत दरोडेखोर करीत असून घामाचा पैसा मागायचा असेलतर संघर्ष हाच पर्याय आहे असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज जनजागृती अभियान अंतर्गत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्कासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सायंकाळी आढेगाव (ता.माढा) येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पुढे बोलताना राजुशेट्टी म्हणाले की,एक टन ऊसापासून १३५ कि. साखर तयार होते.येथे चांगल्या दर्जाचा ऊस पिकतो पण रिकव्हरी चोरली जाते असा गंभीर आरोप यावेळी राजू शेट्टी यांनी केला.एक टक्का रिकव्हरी म्हणजे दहा किलो साखर म्हणजे ३५० रुपयांचा सरळ तोटा हे सूत्र समजावून सांगितले.यासाठी एक्साईज खाते मॅनेज करून ही साखर चोर पावलांनी काळ्या बाजारात जाते.तुमच्या आमच्या घामाचा काळा पैसा निवडणुकीत उधळला जातो.कोल्हापूर पेक्षा येथे ७०० रुपये कमी जातो. हा पैसा घामाचा, कष्टाचा पैसा आहे. हा पैसा आपण मागितलाच पाहिजे. गेल्या हंगामात जादा दराने साखर विकल्याने कारखान्याकडे अतिरिक्त पैसा जमा होत आहे.

यावेळी शेट्टी यांनी बिहेवी ,इथेनॉल, प्रेसमड, यासह विविध उत्पादनाची सविस्तर माहिती देऊन किती उपपदार्थ तयार होतात. त्याचे एकूण पैसे किती होतात याचीही सविस्तर माहिती दिली. तसेच कारखानदारीतील इतंभूत हिशोब उलगडून तुम्हाला कोणी कधी सांगणार नाही असे म्हणाले. शेतकऱ्याच्या घामाचे पैसे लाटणारे हे सर्व स्टार्चच्या कपड्यातील दरोडेखोर आहेत.त्यांच्यात व चुंबळच्या खोऱ्यातील दरोडेखोरात काहीही फरक नाही असे शेट्टी म्हणाले.ऊस शेती तोट्यात असून ही अवस्था सुधारली नाही तर कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यावर जमीन विकण्याची किंवा चोऱ्या करण्याची वेळ येणार आहे.यापेक्षा तुम्ही संघटनेत या, संघर्ष करा असा सल्ला शेवटी राजू शेट्टी यांनी दिला.

यावेळी बोलताना इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे म्हणाले की,कोल्हापूर जिल्ह्यात जो दर मिळतो आहे त्यास राजू शेट्टी हे कारणीभूत आहेत. या जिल्ह्यातील सर्वपक्षीय कारखानदार रिकव्हरीचा विषय पुढे करून शेतकऱ्यांना सतत लुबाडत आहेत. शिवकाळात सिंचन शून्य टक्के होते तरीही शेतकरी आत्महत्या करत नव्हता.कारण त्यावेळी शिवछत्रपती हे शून्य टक्के दराने कर्ज देत होते.वेळप्रसंगी महाराज कर्ज माफ ही करीत होते.ऊसाचा कोणताही भाग वाया जात नाही असे सांगून कोकाटे यांनी शिवकाळ व आधुनिक सरकार यांच्यातील शेती विषयक धोरणांचा फरक अभ्यासपूर्ण भाषणात स्पष्ट केला.ते म्हणाले की, मी ऊसावर खूप अभ्यास केला असून ऊसापासून वीस पेक्षा जास्त उपपदार्थाची निर्मिती होत आहे.याचा हिशोब त्यांनी थोडक्यात सांगितला.

जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी राज्यात सर्वात जास्त ४६ साखर कारखाने असलेला सोलापूर जिल्हा ऊसदराबाबत मागे का राहतो असा प्रश्न उपस्थित केला.शेतकऱ्यांच्या घामाचा दाम मागण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे असे सांगितले.

यावेळी जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील,रामचंद्र टकले,अजिनाथ परबत,सत्यवान गायकवाड,मदन माने यांच्यासह अनेकांची जोशपूर्ण भाषणे केली.सूत्रसंचालन राजू पाटील यांनी केले.

यावेळी स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील,अमरसिंह कदम,कमलाकर माने-देशमुख,तानाजी बागल,विजय रणदिवे,प्रताप पिसाळ, सिद्धेश्वर घुगे,गणेश लोकरे,प्रा.दीपक पाटील,मदनसिंह जाधव,तानाजी सलगर,रवींद्र गोडसे,रामभाऊ शेळके,अमोल घूमरे,बापूराव वाडेकर,अशोक लवंगारे,रवी जाधव,चंद्रकांत कुटे,गजानन गायकवाड,भारत जाधव यांच्यासह कार्यकर्ते,परिसरातील अनेक गावातील कार्यकर्ते,शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थितांना शपथ देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
Reactions

Post a Comment

0 Comments