बेंबळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 16, 2026

बेंबळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

 बेंबळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन



टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- बेंबळे (ता. माढा) : भारतरत्न यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त बेंबळे येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात अभिवादन कार्यक्रम पार पडला. गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महामानवाला कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.
या कार्यक्रमानिमित्त विविध मान्यवरांनी आपल्या भाषणातून बाबासाहेबांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. प्रसिद्ध वक्ते संतोष शिंदे सर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समाधान सलगर, पोलीस पाटील बिभीषण किर्ते सर, तसेच बौद्धाचार्य दत्तात्रय किर्ते यांनी समाजप्रबोधनपर विचार मांडले.
यावेळी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती’ची स्थापना करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी अभिमान किर्ते, उपाध्यक्षपदी विद्याधर किर्ते यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच इतर सदस्यांचीही निवड करण्यात आली.
कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य पोपट तात्या अनपट, सरपंच विजय तात्या पवार, कैलास दादा भोसले, मनु आबा पवार, सोसायटी चेअरमन माऊली पवार, लक्ष्मण गळगुंडे भाऊसाहेब, माजी पोलीस पाटील माणिक किर्ते, ग्रामपंचायत सदस्य दिपक किर्ते, नामदेव कांबळे, विश्वजीत भाऊ भोसले, अनिल दादा अवताडे, अतुल भैय्या अनपट, बबलू काळे, किशोर कदम, खंडू कांबळे सर, दादा लोंढे, अशोक काळे, अशोक देवकर, पोपट अवताडे, मदन क्षीरसागर, यश भगत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तसेच मंडळाचे कार्यकर्ते शुभम किर्ते, मरिचंद्र किर्ते, रोहित किर्ते, अभिजित भैय्या किर्ते, अभिजित दादा किर्ते, आनंद ताकतोडे, गणेश कांबळे, भैय्या ताकतोडे, अमोल किर्ते, साहिल किर्ते, नवनाथ किर्ते, किशोर ताकतोडे, नागनाथ किर्ते, उमेश कांबळे, योगेश किर्ते, सौरभ किर्ते आदींची उपस्थिती लक्षणीय होती.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बिभीषण किर्ते सर यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले. संपूर्ण कार्यक्रमात उत्साह, सामाजिक एकजूट आणि बाबासाहेबांच्या विचारांप्रती आदराची भावना प्रकर्षाने जाणवली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages