दादाई संस्थेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; पाणपोईचे उद्घाटन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 17, 2026

दादाई संस्थेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; पाणपोईचे उद्घाटन

दादाई संस्थेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; पाणपोईचे उद्घाटन

सोलापूर(कटूसत्य वृत्त):-१४ एप्रिल रोजी दादाई बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेच्या वतीने सेटलमेंट फ्री कॉलनी नं. १ येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी संस्थापक अध्यक्ष युवराज भाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम पार पडला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस संस्थेचे आधारस्तंभ नारायण जाधव तसेच भीमज्योत तरुण मंडळाचे मार्गदर्शक गौतम फडतरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याचप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कै. भगवान तात्या जाधव व कै. लायव्वा भगवान जाधव यांच्या स्मरणार्थ दादाई संस्थेतर्फे पाणपोईचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाला भीमज्योत तरुण मंडळाचे अध्यक्ष राहुल एकमल्ले, अभिजीत फडतरे, संजय गायकवाड, विजय जाधव, निशांत गायकवाड, प्रकाश गायकवाड, मलेश सूर्यवंशी, भारत गायकवाड, निलेश गायकवाड, विवेक जाधव, संतोष गायकवाड, रमेश गायकवाड, समीर विजापुरे, रजाक विजापुरे, अजर शेख, कुणाल जाधव, प्रज्वल जाधव, श्रेयश गायकवाड, प्रथमेश जाधव, निरज जाधव आदी उपस्थित होते.

कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages