सलग १४ वर्षे १००% निकाल, इंडियन मॉडेल स्कूलची परंपरा कायम - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 16, 2026

सलग १४ वर्षे १००% निकाल, इंडियन मॉडेल स्कूलची परंपरा कायम

 सलग १४ वर्षे १००% निकाल, इंडियन मॉडेल स्कूलची परंपरा कायम




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दरवर्षीप्रमाणेच या वर्षीसुध्दा इंडियन मॉडेल स्कूलने यशाची परंपरा कायम राखली आहे. फेब्रु.-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इ.१० वी सी.बी.एस.ई. बोर्डाच्या परीक्षेचा इंडियन मॉडेल स्कूलचा निकाल १००% लागला आहे. इ.१० वीची ही १४ वी बॅच होती. या शाळेने १००% निकालाचे सातत्य सलग १४ वर्षे राखले आहे.
 यावर्षी एकूण १८४ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी ८० विद्यार्थ्यांना ९०% पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. तर ०७ विद्यार्थ्यांनी ८९.००% एवढे गुण मिळवले आहेत.अपूर्वा कोरे ही विद्यार्थिनी ९८.६०% घेऊन शाळेत प्रथम आलेली आहे.श्रीजा जोगदंड ही ९८.००% घेऊन शाळेतून दुसरी आलेली आहे. तर संस्कृती देशमुख व राजवीर साहू हे विद्यार्थी ९७.४०% घेऊन शाळेत तृतीय आलेले आहे. संस्कृती जाधव ९७.२०% घेऊन प्रशालेतून चतुर्थ आलेली आहे तर ईशा भोसले ९७.००% गुण घेऊन प्रशालेतून पाचवी आलेली आहे.
 इंग्लिश या विषयात प्रज्ञेशा कवचाळे हीने १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. मराठी या विषयात ईशा भोसले, संस्कृती साठे, समृध्दी आदलिंगे,धैर्य गोरे,  समृध्दी जगताप या विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. सोशल सायन्स या विषयात सिमरन बलदवा या विद्यार्थिनीने १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. विज्ञान या विषयामध्ये प्रतिथ काळे व रतन देशपांडे या विद्यार्थ्यांनी १०० पैकी ९९ गुण मिळवले आहेत. हिंदी या विषयात श्रीजा जोगदंड या विद्यार्थिनीने १०० पैकी ९९ गुण मिळवले आहेत. गणित या विषयामध्ये अपूर्वा कोरे हीने १०० पैकी ९८ गुण प्राप्त केले आहे. या शिवाय ०७ विद्यार्थ्यांनी ८९% मिळवत यश प्राप्त केलेले आहे.
 सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे इंडियन मॉडेल स्कूलचे अध्यक्ष प्रा.ए.डी. जोशी, सचिव अमोल जोशी, सचिवा सायली जोशी, मुख्याध्यापिका अपर्णा कुलकर्णी, समन्वयक ममता बसंवती, अचला राचर्ला, सुजाता बुट्टे,आदिती कुलकर्णी, मानसी जोशी, रुही काझी व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages