Hot Posts

6/recent/ticker-posts

भाजप सरकारच्या बोल घेवड्या आश्वासनाचा खरपूस समाचार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने "होऊदे चर्चा" कार्यक्रम सावळेश्वर येथे उत्साहात संपन्न झाला.

 भाजप सरकारच्या बोल घेवड्या आश्वासनाचा खरपूस समाचार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने "होऊदे चर्चा"  कार्यक्रम सावळेश्वर येथे उत्साहात  संपन्न झाला.


 मोहोळ (कटूसत्य वृत्त):-तालुक्यातील सावळेश्वर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने सुरू असलेला" होऊ दे चर्चा"  हा भाजप सरकारच्या विरोधात सुरू असलेला कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. 

त्यावेळी मोदी सरकारने नववर्षांमध्ये दोन कोटी तरुणांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले परंतु एक टक्का सुद्धा दिले नाहीत. त्याचबरोबर स्वयंपाकाचा गॅस आणि पेट्रोल डिझेल तसेच शेतकऱ्यांना सुद्धा हमीभाव न दिल्यामुळे हे सरकार नुसते आश्वासन देणारे सरकार असून फोडाफोडी करण्यात या सरकारचा एक नंबर असल्याचं यावेळी शिवसेनेच्या होऊदे चर्चा या कार्यक्रमात तालुकाप्रमुख अशोक भोसले यांनी सांगितले. 

या कार्यक्रमासाठी मोहोळ पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड, शिवसेना तालुकाप्रमुख अशोक भोसले, महेश भोसले, शिवसेना उपतालुकाप्रमुख दिलीप टेकाळे,  विधानसभा अध्यक्ष तुकाराम माने,  नाना हावळे ,शिवसेना शाखाप्रमुख नारायण निळ, बाळासाहेब चटके, हातम शेख ,संतोष तरटे, अभिमान अंबुरे , नरसिंह पाटील,  शहाजी सुरवसे, ज्ञानेश्वर ढमढेरे, रमेश गोरे,  सोपान शिंदे, हरी टेकाळे,  प्रशांत टेकाळे,  कैलास टेकाळे,  पांडुरंग टेकाळे आधी सह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरज सगर यांनी आभार मानले आणि दिलीप टेकाळे यांनी सूत्रसंचालन केले.

Reactions

Post a Comment

0 Comments