रोटरी क्लब सराटी डीलाईट वतीने ११ शिक्षकांना राष्ट्रनिर्माण पुरस्कार
अकलूज (कटूसत्य वृत्त):- रोटरी क्लब सराटी डीलाईट यांचे वतीने ११ शिक्षकांना राष्ट्रनिर्माण पुरस्कार डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. मंजू फडके व असिस्टंट गव्हर्नर रो. हनुमंतराव पाटील यांचे शुभहस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक करताना रोटरी सराटीचे अध्यक्ष अनिल जाधव यांनी रोटरी क्लब सराटीने केलेल्या कार्याचा आढावा घेतला. गव्हर्नर मंजू फडके यांनी सर्व शिक्षकांचे कौतुक करतानाच रोटरीचे जगभरात काम कसे चालते याबद्दल माहिती दिली यावेळी खालील शिक्षकांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. सिद्धेश्वर बसवराज घुगरे-जि.प. शाळा रेडे कविता बापू कोळेकर-जि. प. शाळा पुरंदावडे, संजय माणिकराव पवार- दी मॉडल विविधांगी प्रशाला माळीनगर, वसीम हनीप सय्यद- शिवरत्न इन्स्टुटुट ऑफ मॅनजमेंट स्टडीज, नुतन सूर्यकांत जगदाळे- जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ,सराटी, शंकरराव रामचंद्र यादव- चंद्रशेखर विद्यालय श्रीपूर, आकाश दत्तात्रय कदम- महर्षी शंकरराव मोहिते पाटील प्रशाला शंकरनगर, संजय पंढरीनाथ शिंदे-सदाशिवराव माने विद्यालय अकलूज, राजश्री संदीपान पवार- सदाशिवराव माने विद्यालय अकलूज, भाऊ बबन वनवे- श्रीराम शिक्षण संस्था पानीव, सयाजी श्रीपती माने- जि.प. शाळा निमगाव(म) यावेळी डिस्ट्रिक्ट डायरेक्टर रो.विकास टोपले, रो. सुशील जाधव, रो. नरेंद्र गांधी, रो. आझाद पटेल, डॉ. संजय सीद, डॉ. तृप्ती सीद, रणजीत देशमुख, ९०.८ FM चे शंकर बागडे,नितीन बनकर, अरुण एकतपुरे, अमोल शिंदे उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रो. अभिजित चंकेश्वरा, रो. नितीन दोशी, रो. विठ्ठल गायकवाड, रो. जगदीश कदम, रो. महादेव पाटील, रो. राजेश कोपनर रो. अमित भोसले, रो. प्रशांत जाधव, रो. सौरभ वाघ रो.स्वाती चंकेश्वरा, रो.मानसी कदम, रो.मनीषा गांधी, रो. मेघा जामदार , रोअमोलिका जामदार, रो. संयुक्ता दोशी, रो.मृणाल दोशी यांनी परिश्रम घेतले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजाराम गुजर व सुहास उरवणे यांनी केले तर आभार सेक्रेटरी रो. विलास शिंदे यांनी मानले.
.png)
No comments:
Post a Comment