जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ माढ्यात मराठा आंदोलकाचा संताप,टायर जाळून केला बोंबा बोब करीत नोंदवला निषेध - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 4, 2023

जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ माढ्यात मराठा आंदोलकाचा संताप,टायर जाळून केला बोंबा बोब करीत नोंदवला निषेध

 जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ माढ्यात मराठा आंदोलकाचा संताप,टायर

 जाळून केला बोंबा बोब करीत नोंदवला निषेध 


माढा (कटूसत्य वृत्त):-जालन्यातील मराठा समाजातील आंदोलकावर झालेल्या हल्याच्या घटनेच्या निषेधार्थ माढा शहरात मराठा समाजाने तिव्र आंदोलन केले.तसेच  दुपार पर्यंत माढा  शहरातील बाजार पेठ कडकडीत बंद पाळण्यात आला.

माढ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात टायर पेटवून निषेध आंदोलन करण्यात आले.सकाळी १० वाजता मराठा समाज बांधवानी एकत्रित येऊन टायर पेटवून बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजिनामा द्यावा पोलिस अधिक्षकांसह लाठीचार्ज केलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई ची मागणी करण्यात आली.एक मराठा लाख मराठा..आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे यासह अन्य घोषणा देत मराठा आंदोलकांनी संताप व्यक्त करीत शिंदे-फडणवीस पवार सरकारवर जोरदार टीकास्त्र केली.
यावेळी शंभु साठे,शहाजी चवरे,दिनेश जगदाळे,दत्ताजी शिंदे,राजु साठे,मुन्ना साठे,किरण चव्हाण,महेश चवरे,मदन मुंगळे,अजिंक चव्हाण,रानबा कदम,मुजीब तांबोळी आदींनी मनोगतातून लाठीमार झालेल्या घटनेचा निषेध नोंदवुन गृहमंत्र्याच्या राजीनाम्याची आग्रही मागणी करुन मराठा समाजाने आरक्षणासाठी राज्यभरात ५८ मोर्चे शांततेत काढल्याचे सांगण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराज चौकात टायर जाळून केलेल्या आंदोलनात बहुसंख्येने मराठा समाजासह अन्य समाज बांधव बहुसंख्येने सहभागी झाले होते.

 आमदार बबनराव शिंदे ही आंदोलन पाहून थांबले अन् दिला पाठिंबा-छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन सुरु असतानाच माढ्याचे आमदार बबनराव शिंदे हे तिथुन जात असताना त्यांना आंदोलन सुरु असल्याचे दिसताच गाडी थांबवून त्यांनी जालना येथील घटनेचा निषेध नोंदवत संबधित जबाबदार अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी करीत आंदोलनात सहभाग नोंदवत मागणीला पाठिंबा दर्शवला.

 रूग्णवाहिकेला दिली वाट-आंदोलन सुरु असतानाच माढा ग्रामीण रुग्णालयाची रुग्ण घेऊन रुग्णवाहिका चालली होती.दरम्यान आंदोलना वेळी झालेल्या गर्दीत रुग्णवाहिकेचा आवाज ऐकताच मराठा आंदोलकांनी तात्काळ वाट करुन दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages