घरफोड्या करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, एक जण अटक तिघे जण फरार
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुक्यातील ग्रामीण भागात विविध ठिकाणी घरफोडया करणाऱ्या टोळीचा मोहोळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी पर्दाफाश केला असून, एक जणाला अटक केली आहे. त्याच्याकडून सोन्याचे दागिने, घड्याळ, चांदीचे नाणे, गॅस सिलेंडर, असा एकूण दोन लाख पंधरा हजार पाचशे चा ऐवज जप्त केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली.
राम उर्फ पीपी काळूराम भोसले (वय-45, रा. पिटकेश्वर, ता. इंदापूर) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. या टोळीतील अन्य तिघे जण फरार आहेत. अटक केलेल्या राम उर्फ पीपी भोसले याला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील ग्रामीण भागात फेब्रुवारी महिन्यापासून वाळूज, अनगर, पेनुर, शेटफळ या ठिकाणी अचानकपणे घरफोडीचे सत्र सुरू झाले होते. घरफोड़ी थांबविण्यासाठी पोलीस निरीक्षक घुगे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले होते, त्या मार्गदर्शना नुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी कसोशीने प्रयत्न करीत होते.
मात्र हाती काहीही लागत नव्हते. दरम्यान पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणे, नाकाबंदी करणे, तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास करणे, तसेच बार्शी, कामती, मंगळवेढा, मोहोळ, अकलूज, सोलापूर शहर तसेच महाराष्ट्रातील व परराज्यातील गुन्हेगारांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास केला.
तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडे लक्ष दिले. तांत्रिक पद्धतीने तपास करून व गोपनीय बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे काही संशयित इसमांची नावे मिळून आली होती. त्यात राम उर्फ पीपी काळूराम भोसले (वय-45, रा. पिटकेश्वर, ता. इंदापूर) संजय नवनाथ काळे, अजय नवनाथ काळे दोघे रा सुर्डी ता बार्शी, चिरंजीव उर्फ खोडग्या हारकु काळे रा भोयरे ता मोहोळ या संशयीतांचा गुप्तपणे अभ्यास चालू ठेवला होता.
अलीकडील काळात ते कोठे जातात, त्यानी काय खरेदी विक्री केली काय, त्यांच्या रोजच्या हालचालीवर बारकाईने नजर ठेवून त्यांची माहिती काढून त्यातून सध्याच्या घरफोडी व जबरी चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाल्याने या चौघांपैकी राम उर्फ पीपी भोसले याला अटक करून कसोशीने चौकशी केली असता त्याने गुन्हे केल्याची कबुली दिली.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, डीवायएसपी भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद घुगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हे गडकर, पोलीस उपनिरीक्षक सुधीर खारगे, पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन माने, पोलीस नाईक अमोल घोळवे, पोलीस नाईक प्रवीण साठे, पोलीस कॉन्स्टेबल सिद्धनाथ मोरे, पोलीस कॉन्स्टेबल अजित मिसाळ, संदीप सावंत, स्वप्निल कुबेर, यांनी केली. सायबर पोलीस ठाण्याकडील धीरज काकडे यांनी गुन्ह्यातील संशयीता कडून तपास करून गुन्ह्यातील चोरीला गेलेला ऐवज हस्तगत करण्यास मदत केली.
मोहोळ तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीतील पाणबुडी मोटारी तांब्याच्या केबल्स चोरीला गेल्या आहेत. सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती फारच अडचणीची आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्या ही संशयीता पर्यंत लवकर पोचून त्यांना गजाआड करणार आहोत. अशा चोरीच्या मोटारी अथवा अन्य वस्तू विक्रीस आल्यास मोहोळ पोलीस ठाण्याची संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी केले आहे.
.png)
No comments:
Post a Comment