'भीमा'कडून २२०० चे ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 4, 2023

'भीमा'कडून २२०० चे ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

 'भीमा'कडून २२०० चे ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

चेअरमन विश्वराज महाडिक यांची माहिती




 कुरुल (कटूसत्य वृत्त):- भीमा सहकारी साखर कारखान्याला गळीत हंगाम २०२२-२०२३ मध्ये गाळपास आलेल्या ऊस बिलापोटी प्रतिटन २ हजार २०० रुपये प्रमाणे ऊस बिल सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले असल्याची माहिती भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज धनंजय महाडिक यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

ते पुढे म्हणाले कि, राज्यातील बहुतांश सहकारी साखर कारखान्यांना उर्जितावस्था देण्यासाठी एनसीडीसी ने मोठे सहकार्य केले आहे. राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी पथक परिश्रम केल्यामुळे भीमाला हे कर्ज प्राप्त होऊ शकले. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्यासह साखर आयुक्त प्रादेशिक सहसंचालक साखर व डीसीसी बँकेचे प्रशासक कुंदन भोळे यांचे खूप मोठे सहकार्य केले असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. गळीत हंगाम २०२२-२३ मधील गाळप झालेल्या ऊसाचे बिल देण्यासाठी असंख्य अडचणी असताना आणि निसर्गाची साथ नसताना भीमा कारखान्याची प्रगतीकडे झेप आहे. शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवुन खा.महाडिक यांनी नेहमीच शेतकऱ्यांबाबत सकारात्मक भूमिका ठेवत आहेत.
 यंदा पावसाने बऱ्यापैकी ओढ दिली आहे. तरीही अजूनही पाऊस पडेल अशी आशा कायम ठेवून ऊस शेती जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे. येणारा गळीत हंगाम अत्यंत चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी संचालक मंडळ व प्रशासन कामाला लागले असून जास्तीत जास्त गाळपाचे उद्दिष्ट ठेवून सर्व सभासद आणि बिगर सभासद शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्याच कारखान्याला ऊस घातला पाहिजे असे आवाहन त्यांनी शेवटी केले. यावेळी व्हाईस चेअरमन सतीश जगताप, कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे, कार्यालयीन अधीक्षक भाऊसाहेब जगताप यांच्यासह संचालक व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages