सरकारचा पुतळा जाळून टाकळी सिकंदरच्या मराठा समाजाचे निषेध आंदोलन
कुरुल (कटूसत्य वृत्त):- मराठा समाजाला आरक्षण देण्यासह इतर मागण्यांसाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलन मनोज जरांगे यांच्यासह ग्रामस्थ अमोल उपोषणाला बसले होते. या आंदोलनात आंदोलन करते व पोलिसात धरपकड झाल्याने शांततेच्या आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केल्याने या चिघळलेल्या आंदोलनात अनेक मराठा बांधव जखमी झाले. या घटनेचा निषेध करण्यासाठी मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील मराठा बांधवांनी सरकारच्या पुतळ्याचे दहन करून जोरदार घोषणाबाजी केली.
'एक मराठा लाख मराठा, या सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय' या घोषणा देऊन टाकायचे सिकंदर चौक दणाणून सोडला. यावेळी अनेक व्यक्तींनी आपले मनोगत व्यक्त करून सरकार यांच्याबद्दल असंतोष व्यक्त केला.
यावेळी अशोक चव्हाण, संग्राम चव्हाण, हिम्मतराव पाटील, शिवाजी चव्हाण, संतोष चव्हाण, मंगेश चव्हाण, पांडुरंग चव्हाण, नागेश चव्हाण, नितीन चव्हाण, प्रवीण चव्हाण, मुन्ना भुसे, हनुमंत पाटील, संतोष डोंगरे, प्रवीण भोसले, प्रदीप बचुटे, बबन चव्हाण, सुनील चव्हाण, ज्योतिबा चव्हाण, नागेश चव्हाण, माऊली चव्हाण, विक्रम चव्हाण, बिभीषण वाघ, अनिल चव्हाण, ओम चव्हाण, शितल यादव, बंडू यादव यांच्यासह सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment