प्रभाग क्रमांक सहा मध्ये काँक्रीट रस्त्याच्या कामाचे युवा नेते अजिंक्यराणा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, September 8, 2023

प्रभाग क्रमांक सहा मध्ये काँक्रीट रस्त्याच्या कामाचे युवा नेते अजिंक्यराणा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

 प्रभाग क्रमांक सहा मध्ये काँक्रीट रस्त्याच्या कामाचे

 युवा नेते  अजिंक्यराणा  पाटील यांच्या हस्ते उद्घाटन 

ज्येष्ठ नेते शाहजान मालक शेख यांची उपस्थिती

 
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ शहरातील प्रभाग क्रमांक सहा मध्ये आमदार राजनजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार यशवंत तात्या माने यांच्या विशेष सहकार्यातून नगरसेवक दत्तात्रय खवळे नगरसेवक मुस्ताक शेख यांच्या प्रयत्नाने वार्ड क्रमांक सहा मधील कांबळे घर ते पाटील घर अंतर्गत रस्ता भूमिगत गटार बांधकाम या कामाचे भूमिपूजन करून श्रीफळ वाढवून कामाचे पूजन करून काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नेते शहाजान शेख सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. 

   राष्ट्रवादीचे नगरसेवक मुस्ताक शेख आणि दत्ता खवळे यांनी माजी आमदार राजन पाटील आणि आमदार यशवंत माने यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत या कामासाठी नगरविकास विभागाकडून निधी मंजूर करून आणला आहे.

यावेळी उपस्थिती नगरसेवक मुस्ताक शेख, दत्तात्रय (आण्णा) खवळे, प्रमोद बापू डोके, कल्पनाताई खंदारे, अर्जुन शिरसागर, गौतम क्षीरसागर, नागेश बिराजदार, राजू सनगर, आबा भोसले, नागेश पवार, हुजेफ शेख, असिफ शेख उमेश कांबळे असलम शेख, महादेव गायकवाड, जावेद बागवान, अझरुद्दीन शेख, अनिल चोरमले, साकिब शेख, आदित्य गोटे इत्यादींसह नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages