चांगदेव पाटील माध्यमिक विद्यालय दहिटने येथील शिक्षिका श्रीमती. भाग्यश्री नागनाथ साबळे. राज्यस्तरीय गुणवंत शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित.. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, September 8, 2023

चांगदेव पाटील माध्यमिक विद्यालय दहिटने येथील शिक्षिका श्रीमती. भाग्यश्री नागनाथ साबळे. राज्यस्तरीय गुणवंत शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित..

 चांगदेव पाटील माध्यमिक विद्यालय दहिटने येथील शिक्षिका श्रीमती.

 भाग्यश्री नागनाथ साबळे. राज्यस्तरीय गुणवंत शिक्षकरत्न पुरस्काराने

 सन्मानित..


  वैराग (कटूसत्य वृत्त):-श्रीमती भाग्यश्री नागनाथ साबळे या मु. सारोळे पो.पोखारापुर ता. मोहोळ येथील रहिवासी असून चांगदेव पाटील माध्यमिक विद्यालय दहीटने येथे सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.

        विद्यार्थ्यांना विविध उपक्रमातून ज्ञानदानाचे पवित्र  कार्य त्या करतात. विद्यार्थ्याला अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी तसेच  प्रत्येक विद्यार्थ्याने प्रत्येक उपक्रमामध्ये आवडीने सहभागी व्हावे यासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात. आणि त्या कार्याची दखल घेऊन मनुष्यबळ विकास लोकसेवा अकॅडमी या संस्थेने त्यांना मुंबई येथे होणाऱ्या  राज्यस्तरीय गुणवंत गुरु गौरव शिक्षक रत्न पुरस्कार 2023 साठी त्यांची निवड केली आहे.

     या पुरस्काराचे श्रेय त्या आई वडील, सासू सासरे दोन्ही कुटुंबाकडील नातेवाईक, त्याचबरोबर त्यांचे पती ॲड. संतोष राहूल बनसोडे हे  कोणत्याही कार्यासाठी नेहमी प्रोत्साहन देतात. दहिटने गावातील पालकवर्ग,  सहकारी शिक्षकवर्ग आणि ज्यांच्यामुळे आज हा पुरस्कार प्राप्त झाला असे लाडके विद्यार्थी.तर सर्वच स्तरातून शिक्षिका श्रीमती. भाग्यश्री नागनाथ साबळे यांचे अभिनंदन व्यक्त करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages