वाशिंबे येथे कडकडीत बंद पाळत ग्रामस्थांनी केला लाठीहल्ल्याचा निषेध
वाशिंबे (कटूसत्य वृत्त):- अंतरवली सराटा जि.जालना येथे मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचे आदोलंनकर्ते,निष्पाप महिला व लहान मुले यांच्यावर अमानुषपणे लाठीमार हल्ला केला गेला.यांच्या निषेधार्थ गावोगावी लाठीमारांचे पडसाद उमटत आहेत.कडकडीत बंद पाळत सरकारचा निषेध करत,मराठा आरक्षणचे उपोषणकर्ते मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थनांत वाशिंबे येथे बंद पाळत सकल मराठा समाजाच्या वतीने निदर्षने केली गेली.यावेळी रस्त्यावर टायर पेटवून संतप्त प्रतिक्रिया नोंदविण्यात आली.'आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं ' 'एक मराठा लाख मराठा' 'जय भवानी जय शिवाजी' घोषणा देत युवकांनी आक्रमक आपली मनोगत व्यक्त करत शासनाच्या विषयी नाराजी दर्शवली.यावेळी मराठा आरक्षण देण्यास सरकार असमर्थ ठरल्याने सरकार विरोधात निदर्शने केली.लाटीचार्जचा निषेध करत या घटनेचा सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवत सहभाग नोंदवला.या घटनेची सखोल चौकशी करुन राज्य सरकारने त्वरित आरक्षणाचा तिढा सोडवाची मागणी यावेळी करण्यात आली

No comments:
Post a Comment