कर्मयोगी आ. बबनदादा शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, September 2, 2023

कर्मयोगी आ. बबनदादा शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य...

कर्मयोगी आ. बबनदादा शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य...

... माढा तालुका व मतदारसंघातून १० हजार ६५५  रक्त बाटल्यांचे
 संकलन...
.. राज्यात अग्रेसर ,अविस्मरणीय व उच्चांकी रक्तदान

 टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- एक सप्टेंबर 23 रोजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या ७२व्या वाढदिवसाच्या औचित्याने  16 ऑगस्ट 23 पासून माढा तालुक्यातील 109 , माढा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या पंढरपूर तालुक्यातील 42  व माळशिरस तालुक्यातील 14  अशा एकूण 165 गावांमधून रक्तदान  व रक्त संकलन मोहीम कार्यक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला सुरुवातीला 5000 रक्त बाटल्या संकलन करण्याचे नियोजन होते पण नंतर  या आव्हानात्मक कार्यक्रमास प्रचंड प्रतिसाद मिळाला असुन एक सप्टेंबर 23 रोजी एकूण १० हजार ६५५ रक्त बाटल्याचे संकलन यशस्वीरित्या करण्यात आले व महाराष्ट्र राज्यात एक अविस्मरणीय व उच्चांकी रक्तदान-रक्त संकलन मोहीम प्रभावीपणे यशस्वी करून दाखवली आहे. यामुळे माढ्याचे नाव व आमदार बबनदादा शिंदे यांचे एक प्रभावी सामाजिक कार्य राज्यात आदर्श, ऊच्यांकी व संस्मरणीय ठरले आहे.
      रक्तदान मोहीम राबवण्यासाठी कारखान्याचे सर्व संचालक, माढेश्वरी बँकेचे संचालक, माढा मतदारसंघातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, दूध संस्था, शिक्षण संस्था सदस्य व गावो गावचे हजारो- लाखो आमदार बबनदादा शिंदे व शिंदे घराणे विषयी आस्था,प्रेम, आपुलकी व आपलेपणा असणारे महिला,पुरुष व युवक कार्यकर्ते सहभागी झाले होते .,तसेच साखर  कारखान्यातील सर्व विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांनी अहोरात्र झटून ही रक्तदान-रक्त संकलन मोहीम यशस्वी करून दाखवली.  या मुळे माढा विधानसभा मतदारसंघाचे नाव राज्यात निश्चित आदर्श व प्रेरणादायी ठरणार याबद्दल तिळमात्र शंका नाही.

 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages