सिंहगड पब्लिक स्कूल केगाव सोलापूर या शाळेची कला व क्रीडा क्षेत्रामध्ये चमकदार कामगिरी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सिंहगड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या कला व क्रीडा गुणांना वाव देण्याचा तसेच त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी नेहमीच प्रयत्न केला जातो. त्याचीच प्रचीती म्हणजे यावर्षी झालेल्या खालीलप्रमाणे विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी. दि. २५.०८.२०२३ रोजी सोलापूर सहोदया यांच्याद्वारे पार पडलेल्या गायन स्पर्धेत मोठ्या गटात साक्षी पाटकर हिने द्वितीय क्रमांक पटकावला तसेच लहान गटामध्ये तनिष्का शिंदे हिनेदेखील द्वितीय क्रमांक पटकावला. या वर्षी सोलापूर येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप १७ वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये सिंहगड पब्लिक स्कूलने उत्तम कामगीरी करत द्वितीय क्रमांक पटकावला. जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून घेण्यात येणाऱ्या तालुकास्तरीय आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेमध्ये मुलाच्या १४ वर्षा पिलच्या दोन्ही संघांनी प्रथम क्रमांक पटकावत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दोन्ही संघ पात्र झाले आहेत.
दि.२८.०८, २०२३ रोजी झालेल्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये (Athletics) १४ वर्षाखालील मुलामध्ये अतुलकुमार सिंग २०० मी. धावणे (प्रथम), सुयश भोसले ६०० मी. धावणे (प्रथम), वीरांश वर्मा थाळीफेक (प्रथम) व ४०० मी. धावणे (द्वितीय), संवश केवटे १०० मी. धावणे (तृतीय)तसेच १०० मी. रिले संघ (प्रथम).२४ वर्षाखालील मुलींमध्ये अनुष्का गायकवाड गोळाफेक (द्वितीय) तसेच ४४१०० मी. रिले संघ (द्वितीय),१० वर्षाखालील मुले शंभो पाटील तिहेरी उडी (प्रथम), रिषभ दळती भालाफेक (द्वितीय) हर्षवर्धन गवळी ४०० मी. धावणे (द्वितीय) तसेच४४१०० मी. रिलेसंघ (द्वितीय),१० वर्षाखालील मुली राजनंदिनी जाधव- तिहेरी उडी (प्रथम), कल्याणी शिंदे भालाफेक व थाळीफेक (द्वितीय) तसेच ४४१०० मी. रिले (द्वितीय), ४४०० मी. रिलेसंघ (द्वितीय)संघ • दि. ०१.०९.२०२३ रोजी तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा झाली १४ वर्षांखालील मुलांमध्ये अभयसिंह यादव, समर्थ जगताप तसेच १४ वर्षांखालील मुलींमध्ये तनया गवळी, आणि १७ वर्षाखालील मुलींमध्ये श्रेया मोरे, स्नेहल देशमुख अशा एकूण ५ विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांचे प्रोत्साहन लाभले तसेच शाळेच्याप्राचार्य निखत शेख, उपप्राचार्य प्रकाश नवले, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या सर्व विजयी विद्यार्थ्यांना कला शिक्षक दशरथ शिंदे तसेच क्रीडाशिक्षक सीमा मादगुंडी, प्रशांत जाधव अजित कट्टे यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:
Post a Comment