आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत लोकमंगलच्या विद्यार्थ्यांच्या संघाचे यश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 4, 2023

आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत लोकमंगलच्या विद्यार्थ्यांच्या संघाचे यश

 आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत लोकमंगलच्या विद्यार्थ्यांच्या संघाचे यश 


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धा के व्ही पटेल कृषी महाविद्यालय, शहादा या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाने  द्वितीय क्रमांक पटकावून यश संपादन केले. या संघात लोकमंगल कृषी महाविद्यालयाचे रत्नदीप साठे, स्वराज मगर व लोकमंगल कृषीव्यवसाय  व्यवस्थापन महाविद्यालयाचा प्रणव फुगे या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. तहसीलदार दीपक गिरासे, शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई दीपक पाटील व कृषि महाविद्यालय पुणे क्रिडा अधिकारी प्रा. डॉ. ए. जे नलावडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी लोकमंगल कृषी महाविद्यालयाचे क्रिडा शिक्षक प्रा. रमेश आडे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशासाठी लोकमंगल समूहाचे संस्थापक सुभाष देशमुख, श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष रोहन देशमुख, सचिव डॉ सौ अनिता ढोबळे, लोकमंगल कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयांचे समन्वयक डॉ अमोल शिंदे, लोकमंगल कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सचिन फुगे व लोकमंगल कृषीव्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य नवनाथ गोसावी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages