तंत्रज्ञानामध्ये महिला आघाडीवर : प्राचार्य धरणे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 4, 2023

तंत्रज्ञानामध्ये महिला आघाडीवर : प्राचार्य धरणे

 तंत्रज्ञानामध्ये महिला आघाडीवर : प्राचार्य धरणे 


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलीटेक्निक येथे प्रथम वर्ष विभागाच्या वतीने प्रथम वर्ष विद्यार्थिनी तसेच पालकांशी हितगुज साधण्यासाठी प्राचार्यांच्या अभिभाषणाचे आयोजन करण्यात आलेले होते. कार्यक्रमाची सुरुवात पालक विद्यार्थ्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. प्रा. सुचेता चौधरी यांनी पालकांना सर्व शाखांचे विभागप्रमुख तसेच प्रथम वर्षातील प्राध्यापक वर्गांची ओळख करून दिली. प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्रा. श्रीशैल मळेवाडी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक कथन करत पीपीटीच्या माध्यमातून पालक व विद्यार्थ्यांना पुढील तीन वर्षांच्या कामकाज व कार्यक्रमाची रूपरेषा उलगडून दाखवत पालकांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य गजानन धरणे यांनी त्यानंतर पालकांशी अभिभाषणाच्या माध्यमातून संवाद साधला. सन २००९ पासून आजवर चालत आलेली महाविद्यालयाची यशस्वी घौडदौड देशात आणि राज्यात प्रथमच एन. बी. ए. नामांकन मिळवणारे महिला महाविद्यालय अशी ख्याती असलेल्या सिद्धेश्वर वुमेन्स पॉलीटेक्निकमधील एकंदर कार्यशाळा तसेच नियोजन यांचे सखोल मार्गदर्शन प्राचार्यांनी पालकांना करून दिले व तंत्रज्ञानाद्वारे महिला आज कशाप्रकारे आघाडीवर आहे त्याचा ओघवता आलेख वाचून दाखवला. नववर्षातील विद्यार्थिनी आणि पालकांचे मनोबल प्राचार्यांच्या अधिभाषणातून वाढल्याचे पालकांनी साधलेल्या संवादातून समोर आले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी विभाग प्रमुख प्रा. श्रीशैल मळेवाडी, प्रा. स्वयंप्रकाश व्यास, प्रा. प्रीती केशेट्टी, प्रा. संदेश नरखेडे, प्रा. रविकिरण पतंगे, प्रा. ओंकार कल्याणशेट्टी, प्रा. आकाश चटके तसेच संतोष ढोणे यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन प्रा. सौ. सुचेता चौधरी यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. प्राजक्ता सप्तश्वा यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages