जालना घटनेच्या निषेधार्थ तडवळे कडकडीत बंद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 4, 2023

जालना घटनेच्या निषेधार्थ तडवळे कडकडीत बंद

 जालना घटनेच्या निषेधार्थ तडवळे कडकडीत बंद


कसबे तडवळे (कटूसत्य वृत्त):- धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे गावकऱ्यांनी मराठा समाजावरती झालेल्या अमानुष वागणूक निषेधार्थ तडवळे बंद ठेऊन निषेध व्यक्त केला.
जालना येथील घटनेच्या निषेधार्थ तडवळे गावकऱ्यांनी दिवसभर संपूर्ण गाव कडकडीत बंद ठेऊन झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणी जाहीर निषेध करत रस्त्यावरती बसून आरक्षणाची मागणी केली.तसेच सरकारने लवकरात लवकर आरक्षणाची मागणी पूर्ण करावी अशी  उपसरपंच प्रताप करंजकर यांनी केले.या बंदला ग्रामपंचायत सर्व सदस्य,गावातील जेष्ठ नेते माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी वाघ,तुळशीदास जमाले,तानाजी जमाले, हरून शेख,मुश्रीफ मुजावर,तेजस भालेराव,दिलीप पानढवळे,गावातील मराठा तसेच सर्व जाती धर्माचे लोक उपस्थितीत होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages