*आर्या कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा* - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, September 8, 2023

*आर्या कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा*

 *आर्या कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा*


टेंभुर्णी  (कटूसत्य वृत्त):- विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आर्या कॉलेज ऑफ फार्मसी टेंभुर्णी मध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र कदम उपस्थित होते . कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन  यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. या वेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आला .
प्रमुख पाहुणे डॉ. महेंद्र कदम यांनी राष्ट्राच्या उभारणीसाठी शिक्षकाची भूमिका किती महत्वाची आहे हे पटवून दिले . महाविद्यालयाचे प्राचार्य धनंजय चव्हाण यांनी शिक्षक दिनाचे महत्व पटवून देत शिक्षकांनी सर्वगुण संपन्न आदर्श विद्यार्थी घडवावा याबाबत मार्गदर्शन केले . याप्रसंगी प्रा. अमर डोके , प्रा. तुषार कन्हेरे , प्रा. संग्राम भोसले तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages