लंम्पी आजाराबाबत आवश्यक उपाययोजना कराव्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, September 8, 2023

लंम्पी आजाराबाबत आवश्यक उपाययोजना कराव्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

 लंम्पी आजाराबाबत आवश्यक उपाययोजना कराव्यात

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील



सोलापूर, (कटूसत्य वृत्त):-लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पशुसंवर्धन विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी  प्रभावीपणे करावी, असे निर्देश महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

               जिल्ह्यात लम्पी आजाराच्या उपाययोजनाबाबत जिल्हा नियोजन भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी, खासदार ओमराजे निंबाळकर, सर्व श्री आमदार यशवंत माने, सचिन कल्याण शेट्टी, प्रणिती शिंदे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शितल तेली- उगले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा  पवार, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एस .सी बोरकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एन. एल. नरळे उपस्थित होते.

             यावेळी बोलताना पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, केंद्र शासनाच्या सुधारीत मार्गदर्शक सुचनेनुसार बाधीत किंवा लसिकरण केलेल्या पशुधनाच्या वासरांनाही लसीकरण करावे. जनावरांना आजार झाल्यास, अपुऱ्या पशुवैद्यकीय सेवेमुळे, किंवा नक्की निदान न झाल्यामुळे जनावरे दगावतात व पशुपालकांना उत्पादन, जनावर व औषधोपचारावरील खर्च असे  मोठ्या आर्थिक संकटाला समोरे जावे लागते. यासाठी वेळेत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या.

 यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती जाणून घेतली. व योग्य त्या उपाययोजना राबवाव्यात अशा सूचना दिल्या.

         जिल्ह्यात सात लाख 45 हजार 324 गोवंशीय पशुधन आहे.सध्या जिल्ह्यात दिनांक 1 एप्रिल ते 5 नोव्हेंबर 2023 या कालावधीत 581 जनावरांचा मृत्यू झाला असून, 6 हजार 879 पशुधन बाधित होते. यामध्ये उपचाराने 5 हजार 328 जनावरे बरे झाली आहेत. जिल्ह्यात दररोज सरासरी 55 पशुधन बाधित होत आहे. जिल्ह्यात जनावरांच्या लसीकरणावर भर दिला जात असून,  आत्तापर्यंत सात लाख 56 हजार 800 जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. ए.सी बोरकर यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages