दारफळ सिना हे गावं समता वादी विचारसरणीचे गाव असुन मोठा इतिहास
लाभला आहे- प्रा.शिवाजीराव सावंत
माढा (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील दारफळ सिना हे गावं समता वादी विचारसरणीचे गाव असुन गावाला मोठा इतिहास लाभला असल्याचे सोलापूर जिल्हा शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रा.शिवाजीराव सावंत यांनी सांगितले.
दारफळ (सिना)गावाला जिल्हा नियोजन समितीमधून ७५ लाख रुपयांच्या विविध विकास कामांच्या उद्घघाटन प्रसंगी प्रा.सावंत प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते.प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत विकासकामांचे उद्गघाटन करण्यात आले. प्रा.सावंत बोलताना पुढे म्हणाले,दारफळ येथील आदर्शवत असलेल्या नवभारत विद्यालयाच्या माध्यमातून गावाला चांगल्या विचारांचा आणि संस्कृतीचा आदर्श स्व. .तुकाराम शिंदे यांनी येथील ग्रामस्थांना घालून दिला आहे.गुणवंताची खाण या गावात निर्माण होत असुन सर्वच क्षेत्रात गावातील तरुण राज्यभरातील विविध खात्यात कार्यरत आहेत. सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर येऊन मला सहा सात महीने झाली असताना देखील या काळात माढा तालुक्यातील अनेक दुर्लक्षित रस्त्यांना मंजुरी देऊन कामे सुरू केली आहेत.दारफळ गावचा सर्वागीण विकास या पुढील काळात साधला जाणार असुन निधीची कमतरता भासु दिली जाणार नाही.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दारफळचे सरपंच अशोक शिंदे हे होते.यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख प्रियदर्शन साठे,शिवसेना तालुका प्रमुख मुन्ना साठे,पांडुरंग बारबोले, मोहन बारबोले,पोलिस पाटील,हौसाजी पाटील,बालाजी बारबोले,समाधान मस्के,आशामंत संस्थेचे हणुमंत बारबोले, सुरेश अधटराव,अशोक करळे,बाबा उबाळे,रूपेश आडकर,लक्ष्मण बारबोले,दिनकर बारबोले, प्रकाश आडकर,चतुर्भूज बारबोले,अविनाश देशपांडे, नागनाथ थोरात,यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुरज बारबोले यांनी केले.

No comments:
Post a Comment