परिवहन सेवेचे वाजले बारा..! म्हणूनच शहरात अवैध वाहतुकीचा वाढतोय पसारा..!! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, September 5, 2023

परिवहन सेवेचे वाजले बारा..! म्हणूनच शहरात अवैध वाहतुकीचा वाढतोय पसारा..!!

 परिवहन सेवेचे वाजले बारा..! म्हणूनच शहरात अवैध वाहतुकीचा वाढतोय

 पसारा..!!



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- एकीकडे सोलापूरची स्मार्ट सिटी मध्ये घोषणा करायची आणि दुसरीकडे सोलापूर शहरातील परिवहनची वाट लावायची असाच कार्यक्रम सध्या सत्ताधाऱ्यांकडून आणि प्रशासनाकडून होताना दिसत आहे. गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर शहरातील परिवहन ची अवस्था "आई जेवू घालेना, आणि बाप भीक मागू देईना" अशीच असल्याचं दिसत आहे. मागच्या काही वर्षांमध्ये परिवहनचे चाक गतिमान करण्यासाठी तत्कालीन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र मदने यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न  केले. त्यामुळे परिवहनचे रुतलेले चाक रूळावर आलं. परंतु त्यानंतरच्या काळात एकही प्रामाणिक अधिकारी न मिळाल्यामुळे परिवहनचे चाक पुन्हा एकदा गळा तुटल्यामुळे परिवहन सेवा पूर्णपणे कोलमडून पडल्याचं दिसत आहे . 14 लाखाच्यावर लोकसंख्या असणाऱ्या सोलापूर शहरांमध्ये महापालिका परिवहन विभाग सातत्याने निष्क्रिय राहिल्यामुळेच शहरातील नागरिकांना नाईलाज असतो अवैध वाहतुकीचा पर्याय निवडावा लागतो. त्यामध्ये हे रिक्षावाले मेंढरं कोंबल्याप्रमाणे माणसं रिक्षामध्ये भरतात आणि भरधाव वेगाने वाहन चालवून सोलापूरकरांच्या जीवित अशी खेळत असल्याचं अनेकदा निदर्शनास आलेला आहे. तरीही परिवहन व्यवस्थेला कधीच जाग आली नाही त्यामुळे सोलापूरकरांची दयनीय अवस्था होत असल्याचं दिसतंय. सध्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी परिवहन साठी असून अडचण आणि नसून कोळंबा असेच असल्याचं नागरिकांमधून बोलवलं जात आहे. कारण त्यांच्या कार्य काळामध्ये परिवहनची अवस्था अतिशय बिकट झाली असून पूर्णपणे प्रवासी वाहतूक थांबलेले असून रस्त्यावरच्या बसेस गेल्या कुठे..?
असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जातो आहे.
महापालिका परिवहन सेवेचे बारा वाजल्यामुळे सोलापूर शहरांमध्ये अवैध वाहतुकीचा पसारा वाढताना दिसत असून या सोलापूर शहरांमध्ये पूर्णपणे भंगार असलेल्या हजारो रिक्षा प्रवाशांना घेऊन धावतात. तरीही वाहतूक शाखेचे किंवा मनपाच्या अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात धूर मारणाऱ्या अनेक रिक्षा शहरांमध्ये धावतात त्यामुळे प्रदूषणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना सुद्धा याकडे कुणीही लक्ष देत नाही. अवैध रिक्षा चालक मालक यांचा या अधिकाऱ्यांना हप्ता असल्यामुळे आणि काही जणांना दररोज चिरीमिरी मिळत असल्यामुळेच अवैध वाहतुक राजरोसपणे चालू असल्याचे नागरिकांमधून बोललं जात आहे. शहरामध्ये पूर्णपणे आयुष्य संपलेल्या अनेक रिक्षा टमटम रस्त्यावरून धावत असल्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचा जीव धोक्यात असल्याचं लक्षात आलेलं आहे. अशा शहरांमध्ये प्रदूषण करणाऱ्या धूर सोडणाऱ्या अनेक तीन चाकी रिक्षा आणि टमटम यांची कागदपत्रे चेक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सध्या मोठ्या प्रमाणात नागरिकांमधून होत आहे. या भंगार वाहनांवर नोंदणी आणि पीयूसी नसेल तर अशी वाहने रस्त्यावर हे येऊ नये त्यासाठी आरटीओ कडून क** निर्बंध केले पाहिजेत. गेल्या पंधरा-वीस वर्षापासून जी वाहन आयुष्य संपलं तरी चालत असल्यामुळे अशा वाहनधारकांनी आपली वाहने तपासूनच रस्त्यावर चालवणे गरजेचे आहे अन्यथा पर्यावरणाचे हानी तर होईलच परंतु त्याबरोबरच निष्पाप प्रवाशांचा बळीही जाईल त्यामुळे तात्काळ यावर कडक  उपाययोजना करून कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages