शेतकऱ्यांच्या 13 प्रश्नावर स्वाभिमानीचे धरणे आंदोलन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, September 5, 2023

शेतकऱ्यांच्या 13 प्रश्नावर स्वाभिमानीचे धरणे आंदोलन

 शेतकऱ्यांच्या 13 प्रश्नावर स्वाभिमानीचे धरणे आंदोलन


मंगळवेढा (कटूसत्य वृत्त):- मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या 13 विविध प्रश्नाच्या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने येथील प्रांत कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र युवा आघाडीचे अध्यक्ष अॅड राहुल घुले,जिल्हाध्यक्ष युवराज घुले,तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार,संतोष पुजारी,श्रीशैल हत्ताळी,निसार पाटील ,निलकंट साखरे,रामगोंडा पाटील ,आबा खांडेकर,हे उपस्थित होते.

त्यामध्ये म्हैसाळ योजनेचे पाणी लाभ क्षेत्रातील गावांना तात्काळ सुरू करावे, राजकीय चालढकलीत अडकलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यतेसह निधी उपलब्ध करून लवकरात लवकर काम सुरू करावे. खरीप हंगामात पिक विमा भरलेल्या सुमारे 68 हजार 78 शेतकऱ्यांना 25 % अग्रीम मिळावे,शेतकऱ्याकडील सर्व कर्जाची सक्तीने सुरू आहे. वसुलीला स्थगिती द्यावी,खरिपाच्या पीक कर्जाचे तात्काळ पुनर्गठन करून रब्बी हंगामासाठी नव्याने पीक कर्ज शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे,15 जून पासून बंद असलेली पीएम किसान योजनेची नवीन नोंदणी सुरू करून चूक दुरुस्तीसाठी एक खिडकी योजना सुरू करावी,दुधाला विना कपात 34 रुपये दर देऊन 34 रुपये पेक्षा कमी दर देणाऱ्या दूध संघावर कायदेशीर कारवाई करावी.

पीक पाणी पूर्वीप्रमाणे गाव कामगार तलाठी यांनी शेताच्या बांधावर जाऊन करून घ्यावे,सर्व प्रकारच्या पशुखाद्याचे दर दोनशे रुपये कमी करावे,लंपी आजाराने मेलेल्या जनावराचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावे,

उजनी उजव्या कालव्याचे पाणी मंगळवेढा तालुक्यातील लाभक्षेत्र व माण नदीत सोडावे.चारा डेपो सुरू करून दुष्काळ पट्ट्यातील जनावरांना चारा उपलब्ध करून द्यावा.मनरेगातून विहीर व फळबाग कामे सुरू करावीत या मागण्यासाठी हे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages