शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये डाक कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे आयोजन
सांगोला (कटूसत्य वृत्त):-भारतीय डाक विभाग व शिवाजी पॉलीटेक्निक कॉलेज सांगोला यांचे संयुक्त विद्यमाने कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी डाक कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री. बाबुराव गायकवाड होते. प्रारंभी तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, सोमनाथ गायकवाड, पोस्टमास्टर सांगोला, हनुमंत चव्हाण, सोमनाथ कोरके यांचे स्वागत व सत्कार संस्थाध्यक्ष श्री.बाबुराव गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सोमनाथ गायकवाड व हनुमंत चव्हाण यांनी भारतीय डाक विभागाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. सुकन्या समृद्धी योजना, महिला सन्मान समृद्धी योजना यासारख्या व इतर अनेक बचतीच्या योजनांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. आजची बचत उद्याची गुंतवणूक हे लक्षात ठेवून विद्यार्थ्यांनी आत्तापासूनच बचतीची सवय लावून घ्यावी. तालुका कृषी अधिकारी श्री. शिवाजी शिंदे यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, सूक्ष्म सिंचन योजना, फळबाग योजनांची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना संस्थेचे अध्यक्ष श्री. बाबुराव गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना भारतीय डाक विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना कोठेही न जाता कॉलेजमध्येच पोस्टाचे खाते काढून मिळणार असल्यामुळे त्यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले. सोमनाथ कोरके यांनी प्रास्ताविक केले तर कॉलेजचे प्राचार्य तर डॉ. आर.ए.देशमुख यांनी आभार मानले. प्रा. एस. डी . बावचे यांनी सूत्रसंचालन केले.

No comments:
Post a Comment