Hot Posts

6/recent/ticker-posts

जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळाची बौद्धिक व्याख्यानमाला २४ सप्टेंबरपासून

 जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळाची बौद्धिक व्याख्यानमाला २४ सप्टेंबरपासून

मोहन शेटे, अनय जोगळेकर, काशिनाथ देवधर, डॉ. रवींद्र मिणीयार यांची होणार व्याख्याने

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- गणेशोत्सवानिमित्त जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे  बौद्धिक व्याख्यानमाला रविवार, २४ ते बुधवार २७ सप्टेंबरपर्यंत आयोजित करण्यात आल्याची माहिती गणेशोत्सव समितीच्या अध्यक्षा शैलजा देशपांडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. व्याख्यानमालेचे यंदाचे ४७ वे वर्ष आहे.

जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळाची बौद्धिक व्याख्यानमाला शिवस्मारक सभागृहात दररोज सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. या व्याख्यानमालेचे उद्घाटन रविवार, २४ सप्टेंबर रोजी ६. ३०वाजता सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे यांच्या हस्ते होणार आहे.


व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी इतिहासाचे अभ्यासक मोहन शेटे (पुणे) 'छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे महत्त्व' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दुसऱ्या दिवशी सोमवार, २५ सप्टेंबर रोजी अनय जोगळेकर (मुंबई ) हे 'बलशाली भारत विस्तारणारी क्षितिजे' या विषयावर विषय मांडणी करतील. ज्येष्ठ शास्त्रज्ञ काशिनाथ देवधर (पुणे) यांच्या 'संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारत' या विषयावरील व्याख्यानाने तिसऱ्या दिवशी मंगळवार, २६ सप्टेंबर रोजी सोलापूरकर रसिकांना बौद्धिक मेजवानी मिळणार आहे. तर बुधवार, २७ सप्टेंबर रोजी व्याख्यानमालेचा समारोप होणार असून या दिवशी डॉ. रवींद्र मिणीयार पुणे हे 'स्वर्णिम भारत' या विषयावर मार्गदर्शन करतील.


सोलापूरकर रसिकांनी जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळाच्या व्याख्यानमालेस उपस्थित रहावे व अभ्यासू व्याख्यानांचा लाभ घ्यावा, असे आवाहन गणेशोत्सव समितीच्या अध्यक्षा शैलजा देशपांडे यांनी केले.


या पत्रकार परिषदेस सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे, संचालक ॲड. प्रदीपसिंह राजपूत, पुरुषोत्तम उडता, चंद्रिका चौहान, जगदीश भुतडा, आनंद कुलकर्णी, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य अजितकुमार देशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मुकुंद कुलकर्णी, जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्षा शैलजा देशपांडे, उपाध्यक्ष बसवराज मद्दर्की, सचिवा जागृती देशपांडे, व्याख्यानमाला समिती प्रमुख मदन मोरे, वसंत पोतदार मुख्य कार्यालयातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments