Hot Posts

6/recent/ticker-posts

छत्रपती शिवराय हे मानव जोडणारे महापुरुष होते, आज त्यांच्या नावावर मानव तोडण्याच काम होत आहे - समविचार सभा सोलापूर

 छत्रपती शिवराय हे मानव जोडणारे महापुरुष होते, आज त्यांच्या नावावर मानव तोडण्याच काम होत आहे - समविचार सभा सोलापूर 

         सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मागील काही दिवसांपासून काही विध्वंसक वृत्तीच्या संघटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने दंगल पसरवत आहेत, छत्रपतींच नाव घेऊन धमकावण्याच काम करत आहेत, इतकेच नव्हे तर निरपराधींची हत्या करत आहेत. शिवछत्रपतींनी जातीधर्माच्या भिंती ओलांडून सर्वांना मावळा या उपाधीत जोडले होते. शिवछत्रपतींच नाव समाज तोडण्यासाठी नाही तर जोडण्यासाठी उपयोगात आणावे. -  समविचार सभा सोलापूर  

                   मागील काही दिवसांपासून सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यात मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटना घडविल्या गेल्या आहेत. यात मुस्लिम तरुणांना काही ना काही कारणाने आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याच कटकारस्थान रचले जात आहे. यात तीन ते चार जणांची हत्या देखील करण्यात आली आहे. हजारो कुटुंबे उध्वस्त केले आहेत. कोट्यवधी रुपयांचा नुकसान केले आहेत. हे सर्व नियोजन रित्या केले जात आहे. यात सनातनी वृत्तीच्या संघटना कार्यरत आहेत. समाजात तेढ निर्माण करणे आणि दहशत माजवणे चालू आहे. हे भारताच्या एकतेसाठी आणि अखंडतेसाठी घातक आहे. हे थांबलं पाहिजे यातील सहभागी संघटनांवर बंदी घातली पाहिजे आणि अशांतता अस्वस्थता निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यासह १) पुसे सावळी हल्ल्यातील नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ तीन पट नुकसान भरपाई द्यावी. २) झुंडीच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या वर्धनगड आणि पुसे सावळीतील कुटुंबियांना पंचवीस लाख रुपये मदत द्यावी. आणि एकास शासकीय नोकरीत सामावून घ्यावे. ३) हिंसक घटना घडविणाऱ्या संघटनांवर बंदी घालावी. ४) कोणतीही शहानिशा न करता अटक करून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याच कटकारस्थान रचणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. ५) झुंड हत्या विरोधात टास्क फोर्स स्थापन करून प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र कार्यालय निर्माण करून पुरेसे बळ द्यावे. अशा मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारींना देण्यात आले.

 या प्रसंगी मराठा सेवा संघाचे राम गायकवाड, परिवर्तन अकादमीचे कॉ. रविंद्र मोकाशी, डॉ आंबेडकर स्टुडंट्स असो.चे उत्तम नवगिरे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ॲड गोविंद पाटील, यशवंत फडतरे,  माजी नगरसेवक बबलू गायकवाड, आपचे सुरेश ननवरे, हासिब नदाफ, समीऊल्ला शेख, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान, पोपट भोसले, सौरभ भांड, अनिल जाधव, मोहित निकम,डॉ ए एम शेख, हफीझ महेमुद पटेल, सलिम नदाफ, दाऊद नदाफ, अब्दुल रहुफ पटेल आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments