देशाचे भवितव्य शिक्षकांच्या हातात- उमेश पाटील
साने गुरुजी गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शिक्षकांमुळे भविष्यातील डाॅक्टर,इंजिनिअर,शास्र्तज्ञ,लेखक,आणि अनेक क्षेत्रामध्ये प्रगती करुन देशाचे नाव उंचावणारी पिढी तयार होते.त्यामुळे देशाचे भवितव्य शिक्षकांच्या हातात आहे.असे मत राष्टृवादी काॅग्रेंसचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी व्यक्त केले.
साने गुरुजी शिक्षक सहकारी पतसंस्थेच्यावतीने गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा कार्यक्रम तोगटवीर सांस्कृतिक भवन येथे पार पडला.यावेळी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर माजी प्रशासनाधिकारी काशिनाथ बिराजदार,पतसंस्थेचे चेअरमन सुनिल चव्हाण, व्हाईस चेअरमन सचिन चौधरी,गुरुनाथ वांगीकर,आप्पासाहेब पाटील,सोमेश्वर याबाजी,अनिल गायकवाड,अ.गफुर अरब आदी उपस्थित होते.विद्यार्थ्यांच्या समोर आयएएस अधिकार्यांचा आदर्श ठेवा,जेणेकरुन त्यांच्यापासुन ते प्रेरणा घेतील.असेही मत उमेश पाटील यांनी व्यक्त केले.प्राथमिक शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा शिल्पकार असल्याचे मत काशिनाथ बिराजदार यांनी व्यक्त केले.याप्रसंगी साने गुरुजी उपक्रमशील मुख्याध्यापक म्हणुन अकिफराजा तांबोळी,गुणवंत शिक्षक सिद्बाराम व्हनसुरे,सेवाभावी लिपीक आरती उपाध्ये,सेवाभावी सेवक नानासाहेब ढास तर सेवासदन शाळेला आदर्श शाळा म्हणुन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.सन्मानचिन्ह,शाल व बुके देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सचिव आप्पाराव इटेकर,,संचालक विरभद्र यादवाड,भिमराया कापसे,मुरलीधर कडलासकर,धनाजी मोरे,जयंत गायकवाड,उल्हास बिराजदार, शिवानंद हिरेमठ,महादेवी पाटील व फरजाना रचभरे यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शीतल जालिमिंचे यांनी केले.
0 Comments