पालकमंत्री नॉट रिचेबल...!
दुष्काळाचं सावट...!! शेतकरी घायाळ....!!!
हुतात्मा नगरी आणि एकेकाळचं गिरणगाव म्हणून ज्या सोलापूर शहराची संपूर्ण देशाला ओळख आहे. त्याच सोलापूर जिल्ह्यात सध्या ऐन दुष्काळात पालकमंत्री नॉट रिचेबल असल्यामुळे तमाम शेतकरी आणि नागरिक घायाळ झाले आहेत. पावसाने पाठ फिरवल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना या जिल्ह्यात येण्यासाठी वेळ नसल्यामुळे आम्ही कुणाकडे बघायचं असा प्रश्न सध्या शेतकरी बांधवातून विचारला जातो आहे. सत्ता संघर्षाचा फटका सोलापूर जिल्ह्याला बसला असून आज पर्यंत सोलापूर जिल्ह्याकडे आपला जिल्हा म्हणून पाहणारा आपुलकीचा पालकमंत्री मिळाला नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. शहर मध्य च्या आमदार प्रणिती शिंदे वगळता सोलापूर जिल्ह्यामध्ये दहा ते अकरा लोकप्रतिनिधी असताना सोलापूर जिल्ह्यातून एकालाही पालकमंत्री पदाची खुर्ची न मिळाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सत्ता संघर्षाच्या काळामध्ये सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पदाची खुर्ची संगीत खुर्ची होऊ लागलेली दिसतेय.पालकमंत्र्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे पालकत्व असल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी आणि कष्टकरी पालकमंत्र्यांकडे आशाळभूत नजरेने पाहतो. परंतु सध्या पालकमंत्री या जिल्ह्याकडे ढुंकूनही बघत नसल्यामुळे त्यांचा सगळा कल स्वतःच्या अहमदनगर जिल्ह्याकडे असल्याचे जाणू लागल्यामुळे पालकमंत्री बदलाची चर्चा सुद्धा अधून मधून होऊ लागलेली आहे. महाविकास आघाडीच्या काळामध्ये इंदापूरचे दत्तात्रय भरणे यांनी कोरोना काळामध्ये सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद अतिशय नियोजनबद्धपणे काम करून पूर्ण केले परंतु सत्ता संघर्षा मध्ये दत्तात्रय भरणे यांचे पालकमंत्री पद निघून गेलं. सोलापूर जिल्ह्यातील एकाही लोकप्रतिनिधीला मंत्रिमंडळामध्ये साधं राज्यमंत्रीपद मिळावू शकले नाही त्यामुळे सध्याच्या सरकार विषयी सोलापूरकरांच्या मनामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सोलापूर जिल्ह्यातीलच विकासाची जाण असलेला पालकमंत्री सोलापूरकरांना मिळू न शकल्यामुळेच विकासाला गती मिळण्याऐवजी विकासाला ब्रेक लागू लागल्याचे वास्तव आहे. कांद्याचा प्रश्न सरकारला सोडवता न आल्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आहे. हे पाणी पुसण्यासाठी सरकारने अनुदान जाहीर केलं. परंतु आज हे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात एक छदाम सुद्धा न आल्यामुळे हे सरकार म्हणजे नुसत्या घोषणा करणारं सरकार आहे की काय असा प्रश्नही शेतकरी बांधवातून विचारला जातोय. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूर मध्ये भरीव विकासाच्या योजना आणू..! सोलापूर शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकू..!! इथल्या वस्त्रोद्योग पॅकेज देऊन मोठा हब उभा करू अशा घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी होम मैदान येथील जाहीर सभेत दिल्या होत्या. परंतु आज पर्यंत मोदी सरकारने सोलापूर जिल्ह्यासाठी एकही भरीव योजना दिली नाही त्यामुळे सोलापूर करा मधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सोलापूर शहराची स्मार्ट सिटी मध्ये केंद्र सरकारने नोंद केली. मात्र स्मार्ट सिटी ची कामे बोगस झाली उलट शहराचं विद्रुपी करण झालं. त्यामुळे प्रशासनाच्या नियमित आढावा बैठका घेऊन प्रश्न मार्गी लावणारा पालकमंत्री सोलापूरला मिळावा अशी इच्छा सोलापूरकरांनी व्यक्त केली आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी विकासाचे चाक गतिमान केलं होतं. नंतरच्या काळात मात्र विकासाला गती देणारा पालकमंत्री सोलापूरला मिळाला नसल्यामुळे सोलापूरच्या विकासाला चालना मिळण्याऐवजी विकासाचे चाक गाळात रुतून बसलं असल्याचे दिसत आहे. सध्या पशुपालकांना लंपी आजाराचा जीवघेणा त्रास होऊ लागल्यामुळे आणि या सरकारच्या वतीने मदतीचा दिलासा मिळत नसल्यामुळे आम्ही न्याय कुणाकडे मागायचा असा प्रश्न विचारला जातोय. सोलापूर जिल्ह्यासाठी विकास प्रिय आणि आक्रमक पालकमंत्री द्यावा आणि आमची होत असलेली ससेहोलपट थांबवावी. अशी मागणी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि कष्टकऱ्यांमधून होत आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment