उजनीचे पाणी तात्काळ न सोडल्यास जनहित शेतकरी संघटना ८ सप्टेंबर पासून पाणी सुटेपर्यंत उग्र आंदोलन करणार..! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, September 1, 2023

उजनीचे पाणी तात्काळ न सोडल्यास जनहित शेतकरी संघटना ८ सप्टेंबर पासून पाणी सुटेपर्यंत उग्र आंदोलन करणार..!

 उजनीचे पाणी तात्काळ न सोडल्यास जनहित शेतकरी संघटना  सप्टेंबर

 पासून पाणी सुटेपर्यंत उग्र आंदोलन करणार..!


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- उजनी धरणाचे पाणी सोडण्याचा निर्णय पालकमंत्र्यांनी त्वरित न घेतल्यास येत्या ८ सप्टेंबर सप्टेंबर रोजी भीमा नदीच्या काठावर पाणी सुटेपर्यंत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांनी दिला आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे उजनी धरणांमधून कॅनलच्या डाव्या, उजव्या फाटयामध्ये पाणी सोडण्यात यावे. कॅनॉलच्या या पाण्यामधून आष्टी तलाव भरण्यात यावा. तसेच बोंबाबोंब आंदोलन प्रसंगी पत्रकारांशी बोलताना प्रभाकर देशमुख म्हणाले ,जनहित शेतकरी संघटनेच्या बोंबाबोंब ची दखल घेऊन २९ जानेवारी 2023 ला मोहोळ तालुक्यातील पाटकुल येथील डावा कालवा  फुटून  शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते त्याची नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव लेखी स्वरूपात पाठवलेला आहे पुढील कार्यवाही वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त होतात तो प्रस्ताव पुन्हा वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात येईल आसे लेखी आश्वासन दिले . आष्टी उपसा सिंचन योजनेसाठी संपादित करण्यात आलेल्या पाटकुल येथील जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना देण्याबाबत भूसंपादन अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवलेला आहे याबाबत अध्यक्ष अभियंता बागडे साहेब म्हणाले की आम्हीही पाठपुरावा करू व जनहित शेतकरी संघटनेनेही मा जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करावा   जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख व शेकडो शेतकऱ्यांनी सिंचन भवन समोर काल दिवसभर बोंबाबोंब आंदोलन केले .प्रशासनाने मात्र शेतकऱ्यांना  फक्त पाणी सोडण्याचे आश्वासन दिल्यामुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे. सध्या  जनावराच्या चाऱ्यासाठी केलेली वैरण अन् खरीप हंगामातील पिके  जळून चालली आहेत. या पिकांना जीवदान देण्यासाठी व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी उजनी धरणांमधून डावा व उजवा कालवा ,सिना नदी, भीमा नदीत त्वरित पाणी सोडन्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. तर 23 ऑगस्ट रोजी उजनी धरण पाणी वाटप समितीची बैठक संपन्न झाली होती .त्यामध्ये पाणी सोडण्याबाबत निर्णय झालेला नाही आपल्या भावना आम्ही वरिष्ठापर्यंत कळवु असे उत्तर शेतकऱ्यांना प्रशासनाने दिले आहे.या आंदोलनामध्ये शिवशाल हावळे रमेश डोके, दत्तात्रेय व्यवहारे भाऊसाहेब सातपुते शामराव चौधरी, गोवर्धन घोलप, नानासाहेब भोई, आप्पा भोई महिला शेतकरी  मंदा वागज,ओम शेटे, आकाश सरवळे ,नागेश माने ,जगन्नाथ कदम, श्रीमंत कदम, बालाजी कदम, शिवाजी बरडे ,साईप्रसाद नाईकनवरे, किसन अवताडे ,तानाजी मसलकर, महादेव क्षीरसागर, दत्तात्रय नागटिळक, आदीसह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages