जलजीवन मिशन योजना भ्रष्टाचाराच्या खाईत...? - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, September 1, 2023

जलजीवन मिशन योजना भ्रष्टाचाराच्या खाईत...?

 जलजीवन मिशन योजना भ्रष्टाचाराच्या खाईत...?

पालकमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश...!



सोलापूर (दादासाहेब नीळ):- सोलापूर जिल्ह्यातील जलजीवन मिशन उजनी मध्ये अनेक प्रकारच्या तक्रारी आल्यानंतर ही योजना भ्रष्टाचाराच्या खाईत सापडल्याचे दिसल्यामुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या योजनेत चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश दिल्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर,  बार्शी  आणि सांगोला या तालुक्यातील अनेक भागात जलजीवन मिशन योजना राबविण्यात आली परंतु त्यामध्ये भ्रष्टाचार झाला असून या भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी एक समिती नेमली असून त्या चौकशीमध्ये जलजीवन प्रक्रिया चुकीची राबवल्याचं समोर आलंय. टेंडर प्रक्रियेमध्ये कार्यकारी अभियंताने गंभीर स्वरूपाच्या चुका केल्या आहेत. त्याचबरोबर एनआयटी चुकीची अपलोड केल्यामुळे टेंडर प्रक्रिया पूर्णपणे चुकीची झालेली आहे. या प्रक्रियेमध्ये कार्यकारी अभियंता आणि उपकार्यकारी अभियंता आणि त्यांचे कर्मचारी दोषी असल्याचं दिसून आल्यामुळे दोघा लिपिकांना निलंबित सुद्धा करण्यात आलं होतं. चौकशीसाठी कार्यकारी अभियंता आणि उप कार्यकारी अभियंता यांचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येणार आहेत त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार अखेर मायबाप शासनालाच आहे. जलजीवन मशीन योजनेमध्ये जिल्ह्यात अनेक समस्या निर्माण झाल्या असून जलजीवनाची झालेली कामे ऑनलाईन अपलोड करण्याच्या सूचना सुद्धा दिलेले आहेत. त्याचबरोबर जल जीवन मधूनच सुरू असलेल्या प्रत्येक कामाचा जिओ ट्रॅकचा फोटो बंधनकारक करण्यात आलेला आहे. प्रत्येक कामाचा जिओ टॅग असलेला फोटो जोडल्याशिवाय जलजीवन चे बिल अदा करता येणार नाही असे असले तरी जल जीवन मिशन टेंडर प्रक्रियेमध्ये फार मोठ्या त्रुटी आणि दोष दिसून आल्यामुळे अशा अधिकाऱ्यांचे शासन कान टोचणार का..? भ्रष्टाचार शिष्टाचार समजून मोकाट सोडणार याकडे आता लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages