माळशिरस तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा.अन्यथा तहसीलदारांना घेराव - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, September 1, 2023

माळशिरस तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा.अन्यथा तहसीलदारांना घेराव

 माळशिरस तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा.अन्यथा तहसीलदारांना घेराव


माळशिरस (कटूसत्य वृत्त):- माळशिरस तालुक्यात गेल्या तीन महिन्यापासून पाऊस झालेला नाही. यामुळे माळशिरस तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे तालुक्यात पिण्याच्या पाण्याची व चाऱ्याची टंचाई,निर्माण झालेली आहे. तालुक्यातील गंभीर परिस्थिती पाहता आज तागायत प्रशासनाने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली दिसून येत नाही. अशा परिस्थितीत माळशिरस तालुक्यात दुष्काळ जाहीर करा अन्यथा तहसीलदारांना घेराव घालू असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष अजित बोरकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले

        याचबरोबर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन अजित बोरकर यांनी तहसीलदारांना दिले यामध्ये शासनाने गेल्या सहा महिन्यापासून शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे ,शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज मिळत नाही ते वेळेवर मिळण्यासाठी उपाययोजना कराव्यात. चारा डेपो सुरू करावेत अशा अनेक समस्यांचे निवेदन आज स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले प्रशासनाने याची दखल घेतली नाही तर तहसीलदारांना घेराव घालून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असेही या निवेदनात म्हटले आहे . यावेळी शेतकरी नेते  सोमनाथ वाघमोडे,भानुदास सालगुडे पाटील, डॉ सचिन शेंडगे,अजय सकट, दत्ता भोसले, साहील आतार, राजेश खरात,दादा काळे, समाधान काळे, तेजस भाकरे, सचिन बोरकर, यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

      अल्प प्रजन्यवृष्टीचा प्रदेश असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात पावसाने अधिकचा ताण दिल्याने माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यावर भयंकर संकट ओढावले आहे प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन शेतकरी हिताचे निर्णय घेऊन तात्काळ पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटवावा अन्यथा माळशिरस तालुक्यातील प्रशासनाला रोशाला सामोरे जावे लागेल

अजित बोरकर तालुकाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages