द्रष्टा नेता अशी ओळख असणाऱ्या आ. बबनदादांनी आज दृष्टी देणारा नेता म्हणून निर्माण केली नवी ओळख...! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, September 2, 2023

द्रष्टा नेता अशी ओळख असणाऱ्या आ. बबनदादांनी आज दृष्टी देणारा नेता म्हणून निर्माण केली नवी ओळख...!

 द्रष्टा नेता अशी ओळख असणाऱ्या आ.  बबनदादांनी आज दृष्टी देणारा

 नेता म्हणून निर्माण केली नवी ओळख...!

डॉ. तात्याराव लहाने यांचे गौरोद्गार



माढा (दादासाहेब नीळ):- गेल्या दहा वर्षापासून माढा शहर आणि तालुक्यामधील सर्वसामान्य आभाळवृद्धांशी गेलेली दृष्टी पुन्हा प्राप्त व्हावी या विधायक दृष्टिकोनातून आमदार बबनदादा शिंदे यांनी या ठिकाणी नेत्रालय व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती.
गेली पंधरा वर्षे या ठिकाणी येऊन शस्त्रक्रिया करण्याचे काम आपण करत आहोत इथून पुढे फार मोठे व्हिजन घेऊन माढा अत्याधुनिक आणि अद्यावत नेत्रालयाची पंढरी म्हणून ओळखले जाईल.
त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने देणाऱ्याच्या दातृत्वाचा गुण घेऊन आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या येथूने दहा रुपये जरी दिले तरी फार मोठा मदतीचा डोंगर उभा राहू शकतो. आमदार बबनदादा हातात घेतलेलं काम कधीच पूर्ण झाल्याशिवाय थांबत नाहीत आणि त्यामुळेच आज या ठिकाणी हे नेत्रालय उभा राहत आहे इथून पुढच्या काळामध्ये या ठिकाणी सर्वांना मोफत उपचार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील सध्याच्या काळामध्ये दररोज रुग्णालय चालू राहणार असून शस्त्रक्रिया आठवड्यातून दोनच दिवस केल्या जातील .सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया  करण्यासाठी आपण प्रयत्नशील असून एक कोटी रुपयांची अत्याधुनिक असलेली सध्या नेत्रालयामध्ये उपलब्ध झाल्यामुळे शस्त्रक्रिया करण्याचा मार्गाचा मोकळा झाला असल्याचं डॉक्टर तात्यासाहेब लहाने यांनी यावेळी बोलताना शेवटी सांगितले. आज बबन दादाच्या वाढदिवसानिमित्त 155 शस्त्रक्रिया केल्या जातील.  आणि राहिलेल्या 9 तारखेला करण्यात येतील. सध्या फक्त शनिवार आणि रविवारीच शस्त्रक्रिया होतील ऑक्टोबर नंतर मात्र दररोज शस्त्रक्रिया केली जाईल. असं अभिवाचन यावेळी डॉक्टर तात्यासाहेब लहाने यांनी उपस्थित यांना दिले. या नेत्रालयाच्या उद्घाटन प्रसंगी करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांनी या उपक्रमासाठी संकल्प फाउंडेशन ला शुभेच्छा दिल्या असून सर्वांनीच हा उपक्रम पुढे घेऊन जाण्यासाठी मदतीचा हात देण्याचं आवाहन केलं. याप्रसंगी माजी आमदार विनायक बापू पाटील यांनी आपले मनोगत अतिशय ओघवत्या शैलीत जुन्या घटनांना उजाळा देत केले. या नेत्रालयासाठी पाच वर्ष मोफत हॉस्पिटलची जागा देण्याचं महत्त्वपूर्ण आणि दातृत्वदायी काम शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर बी वाय यादव यांनी केल्यामुळे त्यांना सर्वच मान्यवरांनी धन्यवाद दिले.

याप्रसंगी डॉ.बी. वाय.  यादव बोलताना म्हणाले की, फक्त माढा तालुक्या पुरतच हे नेत्रालय मर्यादित न राहता संपूर्ण राज्यात देशांमध्ये या नेत्रालयाने आपली ओळख निर्माण करावी.  त्यासाठी आपण सहकार्य करण्यास तयार असल्याचं यावेळी बोलताना डॉ.  यादव यांनी सांगितलं.
संकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक काका लुनावत यावेळी बोलताना म्हणाले की, माढा तालुक्याच्या विकासासाठी आजपर्यंत आमदार बबनदादा शिंदे यांनी मंत्री पदाला लाथ मारून भीमा सीना जोड कालव्याला  पसंती देऊन शेतकऱ्याचे हित पाहिलं. त्याचबरोबर या भागामध्ये पिण्याच्या पाण्याचे टंचाई असताना साखर कारखाने उभा करून अनेकांच्या हाताला काम दिलं. शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळाला पाहिजे यासाठी दूध डेरी ची संकल्पना गावागावात राबवली. हरितक्रांती,  धवलक्रांती,  औद्योगिक क्रांती करण्यामध्ये सध्या बबन दादा आघाडीवर आहेत.  फक्त या माढा तालुक्यामध्ये शैक्षणिक आणि आरोग्य क्रांती होणे बाकी होते तेही काम बबन दादाच्या माध्यमातून पूर्णत्वास जात असल्यामुळे आमचा संकल्प सिद्धीस गेला त्यामुळे आम्ही धन्य झालो अशा प्रकारच्या भावना यावेळी अशोक काका लूनावत यांनी व्यक्त केल्या. सत्कारमूर्ती आमदार बबनदादा शिंदे यावेळी बोलताना म्हणाले, माढा तालुक्यामध्ये सध्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे सरकारने ताबडतोब दुष्काळ जाहीर करून टँकर ग्रस्त गावांमध्ये टँकर द्यावेत अशी मागणी त्यांनी यावेळी केली. त्याचबरोबर आज माढ्यामध्ये उभा राहत असलेले हे नेत्रालय भविष्यामध्ये एक अध्यायावत आणि सर्व सोयी पुरवणारं राज्यातलं एक प्रशस्त नेत्रालय म्हणून नावलौकिक मिळेल यात शंका नाही. डॉक्टर तात्यासाहेब लहाने यांच्यासारखे निष्णात डॉक्टर या नेत्रालयामध्ये येऊन रुग्णांची सेवा करणार असल्यामुळे हे नेत्रालय निशिताच उंच भरारी घेतल्याशिवाय राहणार नाही असे यावेळी बोलताना आमदार बबनदादा शिंदे यांनी सांगितले. त्याचबरोबर वाढदिवसानिमित्त तब्बल 10 हजार 555 रक्त बाटल्या रक्त संकलित झाल्या असून निश्चितपणे हे विक्रमी रक्तदान असल्याचं यावेळी अनेकांनी सांगितलं आणि बबन दादांनी सुद्धा रक्तदात्यांचे जाहीर कौतुक केलं.

या कार्यक्रमांमध्ये बबन दादाच माझा विठ्ठल अशा प्रकारचे सर्वांनाच भावनिक करणारी एक कविता विराज चव्हाण या चिमूरड्याने म्हणून वातावरण भावनिक केले.या कार्यक्रमास कृषिभूषण सुनंदाताई शिंदे, डॉक्टर रागिणी पारेख, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, प्रांत अधिकारी प्रियंका आंबेकर , विठ्ठल कारखान्याचे संचालक विक्रम सिंह शिंदे,  बाजार समितीचे उपसभापती सुहास काका पाटील, दूध संघाचे संचालक शंभूराजे मोरे, मार्केट कमिटीचे संचालक हनुमंतराव पाडुळे, जिल्हा परिषद सदस्य बंडू नाना ढवळे, माढेश्वरी अर्बन बँकेचे संचालक गणेश काशीद, संतोष नवले ,शहाजी चौरे ,झुंजार नाना भांगे, तहसीलदार विनोद रणवरे,  डॉ.  गणेश इंदुलकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.  शिवाजी थोरात, गटविकास अधिकारी महेश सुळे, विभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकोट, रामभाऊ शिंदे आदीसह माढा तालुक्यासह जिल्ह्यातील बहुसंख्य नागरिक आणि नेत्र रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages