इतर सेवेची तुलनाकरता शिक्षकांची सेवा ही थैंकफुल आहे- आयुक्त शीतल तेली-उगले
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महानगरपालिकेत विविध विभाग कार्यरत असून सर्व विभाग हे सामान्य माणसाच्या सेवेसाठी कार्यरत असतात. परंतु इतर सेवेच्या तुलनेत शिक्षकांची सेवा ही थैंकफुल असते, असे गौरवोग्दार महापालिका आयुक्त, शीतल तेली-उगले यांनी मनपा प्राथमिक शिक्षण विभागातर्फे आयोजित गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण प्रसंगी केले.
शिक्षक म्हणून कार्यरत असताना आपल्या कार्याबद्दल प्रामाणिकपणा व निष्ठा हे अत्यंत महत्वाचे आहे. तसेच आपण आपले कार्य सेवाभाव वृत्तीने केल्यास आपल्याला समाजात आदराचे स्थान मिळते. आज मी ज्या पदावर आहे तिथे पर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या आई-वडीलांबरोबर माझ्या गुरुजनांचाही वाटा आहे असे सांगण्यासही त्या विसरल्या नाहीत व त्यांच्या ऋणाची मी उतराई करु शकत नाही अशी भावना व्यक्त केली. सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त आयुक्त, संदिप कारंजे, उपायुक्त विद्या पोळ, उपायुक्त - मच्छिंद्र घोलप, दिवाणी न्यायाधीश सुप्रिया बिराजदार, यांची उपस्थिती होती. या वेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. शिवाजीराव शिंदे, यांचे शिक्षकांची अध्यापनातील भूमिका व नवीन शैक्षणिक धोरणात मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात असे म्हटले की, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता, राष्ट्रासाठी सुजान नागरिक घडवण्याचे कार्य करावे. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेचे पुजन वरील सर्व मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. त्यानंतर स्वागतगीताने पाहुण्याचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रशासनाधिकारी, विठ्ठल दिगंबर ढेपे यांनी मनपा शिक्षण विभागातील विविध उपक्रमाची माहिती दिली. त्यानंतर सर्व गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा व शाळेंचा सन्मान चिन्ह व गौरव पत्र आयुक्त यांचे हस्ते देण्यात आले.
कार्यक्रमास मनिष बांगर, संतोष बुलबुले, भगवान मुंढे, सुरेश कासार, रजनी राऊळ, निलोफर सय्यद, काशिनाथ बिराजदार, माहेजबीन शेख व अन्य कार्यालयीन लिपिक वर्ग यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्र संचालन स्नेहा पुजारी व गंगा शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार संतोष बुलबुले यांनी मांडले.
.png)
No comments:
Post a Comment