गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गणेशोत्सव मंडळांनी 15 सप्टेंबरपर्यंत सहभाग नोंदवावा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, September 5, 2023

गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गणेशोत्सव मंडळांनी 15 सप्टेंबरपर्यंत सहभाग नोंदवावा

 गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गणेशोत्सव मंडळांनी 15

 सप्टेंबरपर्यंत सहभाग नोंदवावा


सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- राज्य शासनाने १९ सप्टेंबर २०२३ पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त मंडळांनी १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी केले आहे.
उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गणेश मंडळांना 15 सप्टेंबर 2023 पर्यंत स्पर्धेत अर्ज करता येईल. mahotsav.plda.@gmail.com या ई - मेलवर गणेशमंडळांनी अर्ज करावा. पु. ल. देशपांडे कला अकादमी तर्फे ई-मेलवर प्राप्त अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाला परीक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येईल. जिल्हास्तरीय समितीचे सदस्य स्पर्धेत सहभागी गणेशोत्सव मंडळांचे प्रत्यक्ष भेटी देऊन परीक्षण करतील. व्हिडिओग्राफी आणि कागदपत्रे तपासून अभिप्रायासह गुणांकन करतील. जिल्हास्तरीय समिती जिल्ह्यातून एका उत्कृष्ट गणेश मंडळाची शिफारस पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीला करेल. राज्यस्तरीय समिती राज्यातील उत्कृष्ट ३ गणेश मंडळाची शिफारस अकादमीला करेल. त्यानुसार कला अकादमी विजेत्या मंडळांची घोषणा करेल व विजेत्या गणेश मंडळांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या ४ जुलै २०२३ रोजीच्या शासन निर्णयात स्पर्धेचा तपशील, स्पर्धा निवडीचे निकष नमूद केले आहेत. तसेच अर्जही उपलब्ध करून देण्यात आला आहे. अर्जाच्या या नमुन्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु. ल. देशपांडे, महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई- मेल १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत अर्ज करावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी सहभाग नोंदवावा, असेही आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी श्री.पवार यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages