कुरुल जि.प. शिक्षकांचा सन्मानपत्र देऊन गौरव - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, September 6, 2023

कुरुल जि.प. शिक्षकांचा सन्मानपत्र देऊन गौरव

 कुरुल जि.प. शिक्षकांचा सन्मानपत्र देऊन गौरव

 शिक्षक दिनानिमित्त शाळा व्यवस्थापन समितीचा उपक्रम



 कुरुल (कटूसत्य वृत्त):- शाळेप्रती असलेला आदरभाव, विद्यार्थ्यांना तळमळीने शिकवण्याची आवड, विद्यार्थ्यांशी असलेले ऋणानुबंध आणि गेल्या काही दिवसापासून सुरू असलेली शिक्षकांची सेवा पाहून कुरूल जि.प. प्राथमिक केंद्र शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीने आज डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आणि  शिक्षक दिनानिमित्त शाळेतील सर्व शिक्षकांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

 या सन्मानास उत्तर देताना सहशिक्षक सचिन शिंदे म्हणाले की, शाळा व्यवस्थापन समिती व सर्व पालकांनी केलेला हा गौरव आमच्या कायम स्मरणात राहील. या सन्मान चिन्हामुळे आम्हा सर्व शिक्षकांची जबाबदारी आणखीनच वाढली आहे. ती जबाबदारी आम्ही सक्षमपणे पार पाडून ज्या काही उनिवा आमच्यात असतील त्या दूर करून विद्यार्थ्यांना अष्टपैलू व्यक्तिमत्व घडविण्यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करू असे त्यांनी आवर्जून सांगितले.

 यावेळी मुख्याध्यापक तुकाराम मुचंडे, सचिन शिंदे, रामचंद्र लांडे, हनुमंत हजारे, समाधान गोर्धनकर, अनुराधा सोनवणे, स्मिता लामतुरे, सुवर्णा तोरखडे  या शिक्षकांना मानाचा फेटा, गुलाब पुष्प व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

 यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुहास घोडके, सदस्य लक्ष्मण खंदारे, नानासाहेब ननवरे, अशा आकोस्कर, रुकैया शेख, अशोक पाटील, माऊली माने, बाळासाहेब पाटील, भैय्या माने, गणेश सलगर, सिद्धनाथ शिंदे, पप्पू तांबोळी यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages