चेअरमन कल्याणराव काळे यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त्‍ वसंतराव काळे विद्यामंदिर प्रशालेत विविध स्पर्धा व वृक्षारोपनाचा कार्यक्रम संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 4, 2023

चेअरमन कल्याणराव काळे यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त्‍ वसंतराव काळे विद्यामंदिर प्रशालेत विविध स्पर्धा व वृक्षारोपनाचा कार्यक्रम संपन्न

 चेअरमन कल्याणराव काळे यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त्‍ वसंतराव

 काळे विद्यामंदिर प्रशालेत विविध स्पर्धा व वृक्षारोपनाचा कार्यक्रम संपन्न

 

भाळवणी (कटूसत्य वृत्त):-  सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त्‍ कारखाना साईटवरील वसंतराव काळे विद्यामंदिर, चंद्रभागानगर, भाळवणी  येथे विविध उपक्रम राबविणेत येत असून, आज सर्व विद्यार्थ्यांचे शुभहस्ते शाळेतील प्रांगणात वृक्षारोपन करण्यात आले. तदनंतर रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. सदर कार्यक्रमास विद्यार्थ्यासह मोठ्यासंख्येने पालक वर्गही उपस्थित होता. यावेळी कार्यक्रमास आलेल्या सर्व विद्यार्थ्यांसह पालकांना भोजन वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुरुवातीस श्रीविठ्ठलाचे व स्व्‍.वसंतदादांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले

यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक एस.एल.काळे यांनी सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह.साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा प्रगतीपथावर असून, मुलांच्या शिक्षणासह इतर कला गुणांना वाव देण्यासाठी शाळा सतत प्रयत्न्‍ करीत असल्याचे सांगितले. लहान वयातच मुलांना विविध्‍ प्रकारची रोपे लावून ती जोपासण्याचा छंद लागावा यासासाठी सर्व पालकांनी प्रयत्न्‍ करावेत असेही सांगितले.

यावेळी शाळचे शिक्षक सुहास चौगुले, इरफान शेख, आबासो जाधव, नागन्नाथ जाधव, सचिन काळे, अतुल गायकवाड, शिक्षिका पल्लवी काळे, विद्या जमदाडे, पुष्पा लिंगे, अश्विनी शिंदे व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages