सकल मराठा समाजाच्या वतीने बेगमपूर येथे रस्तारोको आंदोलन
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- अंतरावली ता. अंबड जि. जालना येथील मराठा समाजाच्या अंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ रविवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता सोलापूर कोल्हापूर महामार्गावर शिवाजी चौकात बेगमपूर व परिसरातील नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन करून शासनाचा निषेध करण्यात आला.
यावेळी मराठा समाजा बरोबरच इतर समाजातील लोकांनी सहभाग सहभाग नोंदवून हम सब एक असल्याचे दाखवून देत मराठा समाजावर अन्याय होत असून त्यांना त्वरित आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली यावेळी मराठा समाजातील बाळासाहेब सरवळे, मराठा समन्वय समितीचे महेश पवार, आप्पासाहेब पाटील, तालुका अध्यक्ष सुलेमान तांबोळी,अर्धनारीचे सरपंच पांडुरंग पवार, ब्रम्हपूरीचे आण्णासाहेब पाटील, सचिन नाईकनवरे, डिगंबर कावळे, बालाजी सुरवसे, आदी व बेगमपूर, अर्धनारी, इंचगाव, सोहाळे, वडदेगाव, माचणूर, ब्रम्हपूरी, येणकी परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी किमती पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डूनगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुखदेव गोदे यांनी अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

No comments:
Post a Comment